Join us

महाविद्यालयीन निवडणुकांचा बिगुल वाजला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 1:33 AM

राजकीय पक्षांचे चिन्ह वापरता येणार नाही

मुंबई : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील महाविद्यालयांमध्ये पुन्हा खुल्या मतदानातून निवडणुकांचे वारे वाहणार आहेत. याबाबत राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे महाविद्यालयीन निवडणुकांचा अध्यादेश मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केला. निवडणुकांना आचारसंहितेचे कोंदण आहे.दरवर्षी विद्यापीठाने ३० सप्टेंबरपर्यंत या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. यंदा ही मुदत निघून गेली आहे. सरकारने दोन वर्षांपूर्वीच नव्या सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची घोषणा केली होती. निवडणुकीत मेळावे किंवा मिरवणूक काढता येणार नाही. परीक्षा प्रक्रियेत किंवा कोणत्याही अपराधासाठी दोषी ठरविलेल्यांना निवडणूक लढवता येणार नाही. उमेदवारांनी पॅनल तयार करू नये, अशा सूचना आहेत. वर्ग प्रतिनिधींच्या निवडणुकीसाठी उमेदवारामागे एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्गाच्या प्रतिनिधींच्या निवडणुकीसाठी ५ हजार रुपयांची खर्चमर्यादा असेल.धर्म, जातीचा उल्लेख नकोउमेदवाराने धर्म, जात, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे किंवा संघटनेचे चिन्ह, बोधचिन्ह वापरण्यास मनाई आहे. विद्यार्थ्यांच्या गटांमधील मतभेद विकोपास जातील किंवा परस्पर द्वेष, शत्रुत्व आणि तणाव निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य न करण्याची खबरदारी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

टॅग्स :निवडणूकमहाविद्यालय