मुंबई : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५च्या सर्व विद्याशाखांच्या प्रवेशाच्या अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत. महाविद्यालयाने दिलेल्या मुदतीत प्रवेशप्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना दंड लावण्यात येणार आहे.
काही महाविद्यालये वेळेत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करत नाहीत. तसेच विद्यापीठाला दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज सादर करीत नसल्याने या विद्यार्थ्यांची विद्यापीठात नोंदणी होत नाही किंवा नोंदणी करतात; पण पुढील प्रक्रिया केली नसल्याने विद्यार्थ्याच्या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) तयार होत नाही. तसेच प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने हे निकाल राखीव ठेवावे लागतात. या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेताना अडचणी निर्माण होतात. हे टाळण्यासाठी प्रवेशाची अंतिम मुदत निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रवेश, नावनोंदणी, पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागाचे उपकुलसचिव अशोक घुले यांनी सांगितले.
प्रवेशाचे वेळापत्रकएमकेसीएल/ ई-समर्थ प्रणालीत नोंद करण्याची शेवटची तारीख पुढीलप्रमाणे असेल. पदवी अभ्यासक्रम (कला, वाणिज्य, विज्ञान शाखानिहाय नियमित व व्यावसायिक अभ्यासक्रम) प्रथम वर्ष (१२ वी निकालानंतर) : ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत द्वितीय वर्ष : ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंततृतीय वर्ष : ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत
पदव्युत्तर अभ्यासक्रम(एमए, एमकॉम, एमएस्सी) प्रथम वर्ष सत्र १ व २ : ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतद्वितीय वर्ष सत्र ३ व ४ : ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतव्यावसायिक अभ्यासक्रम(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र), विधि, शिक्षणशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रम) प्रथम वर्ष : सीईटी सेलच्या प्रवेशप्रक्रियेनंतर द्वितीय वर्ष : ३० सप्टेंबर २०२४ पर्यंततृतीय वर्ष : ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतचतुर्थ वर्ष : ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतपाचवे वर्ष : ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत