Join us

..अन् ‘कोलायडर’चे गूढ उलगडले!

By admin | Published: November 11, 2014 12:58 AM

वैज्ञानिक आणि भौतिकशास्त्र, खगोलभौतिकी यामध्ये संशोधन करणारे शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे विश्वाच्या अस्तित्वाविषयीची कोडी उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत,

मुंबई : वैज्ञानिक आणि भौतिकशास्त्र, खगोलभौतिकी यामध्ये संशोधन करणारे शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे विश्वाच्या अस्तित्वाविषयीची कोडी उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत, या अथक संशोधनामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान मोठे राहिले आहे. याचा थरारक प्रवास सोमवारी नेहरू विज्ञान केंद्रात पार पडलेल्या कार्यक्रमात विद्याथ्र्यानी अनुभवला.
हे विश्व नेमके कशाचे बनले आहे, त्याचा शोध घेण्यासाठी  जिनिव्हामध्ये लार्ज हॅड्रन कोलायडर हा उच्च ऊर्जा तंत्रज्ञानातला एक प्रदीर्घ प्रयोग काही वर्षापूर्वी सुरू झाला. या वैश्विक प्रयोगात 39 देशांचे तीन हजार शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. मात्र, त्यातही भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान कितीतरी पटीने अधिक राहिले आहे, याची माहिती या ‘व्हच्यरुअल’ भेटीतून शालेय विद्याथ्र्याना देण्यात आली. ‘युनेस्को’ घोषित जागतिक विज्ञानदिनाचे औचित्य साधत जिनिव्हातील संशोधकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्यात आला.
बिग बॅंगनंतर ज्या मूलकणाने विश्वातील सर्व घटकांना वस्तुमान दिले, त्या हिग्ज बोसॉन या मूलकणाचे अस्तित्व शोधण्यावर आता हा लढा केंद्रित झाला आहे. हिग्ज बोसॉन हे नावही एस. एन. बोस या शास्त्रज्ञाच्या नावावरूनच प्राप्त झाले आहे, हेही या कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विद्याथ्र्याना कळले. काही शालेय विद्याथ्र्यानी संशोधनात करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर संशोधकांनी त्यांना प्रोत्साहन दिले. (प्रतिनिधी)