मोखाडा-खोडाळा रस्त्याची चाळण

By admin | Published: January 29, 2015 10:57 PM2015-01-29T22:57:52+5:302015-01-29T22:57:52+5:30

मोखाडा-खोडाळा या मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असल्याने या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.

The colony of Mokhada-Khogala road | मोखाडा-खोडाळा रस्त्याची चाळण

मोखाडा-खोडाळा रस्त्याची चाळण

Next

मोखाडा ग्रामीण : मोखाडा-खोडाळा या मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असल्याने या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. परंतु, याकडे मोखाडा सा.बां. विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
हा रस्ता कसारा-नाशिक हाय वेला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने लांब पल्ल्यांच्या शेकडो वाहनांची या रस्त्यावरून ये-जा सुरू असते. परंतु, रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मोखाड्यापासून डोल्हारापर्यंत या रस्त्यावर फारसे खड्डे नसले तरी त्यापुढे मात्र हा रस्ता पूर्णत: उखडला असून रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. परंतु, असे असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कसारा घाटापासून अपूर्णच आहे. २०११-१२ पासून या रस्त्यावर सुधारीकरणाच्या नावाखाली करोडोंचा खर्च होत असला तरी सा.बां. विभाग व ठेकेदारांनी कागदावरच कामे केल्याने या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. परंतु, याबाबत कुठूनच हालचाल होताना दिसत नाही. (वार्ताहर)

Web Title: The colony of Mokhada-Khogala road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.