मनसेच्या ध्वजाचा रंग बदलणार? पक्षाच्या वाटचालीबाबत राज ठाकरे मोठा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 03:18 PM2020-01-05T15:18:28+5:302020-01-05T15:20:00+5:30

23 जानेवारी रोजी मुंबईतील गोरेगाव येथे होणाऱ्या महाअधिवेशनात मनसेप्रमुख राज ठाकरे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे

The color of the MNS flag will change? Will Raj Thackeray make a big decision on the party's move | मनसेच्या ध्वजाचा रंग बदलणार? पक्षाच्या वाटचालीबाबत राज ठाकरे मोठा निर्णय घेणार?

मनसेच्या ध्वजाचा रंग बदलणार? पक्षाच्या वाटचालीबाबत राज ठाकरे मोठा निर्णय घेणार?

googlenewsNext

मुंबई - 2009 मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवताना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 13 आमदार निवडून आणत दरण्यात सुरुवात केली होती. मात्र गेल्या काही वर्षांत मनसेची वाटचाल अडखळती झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत मनसेला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. त्यामुळे पक्षाच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने राज ठाकरे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्याचा भाग म्हणून मनसेच्या झेंड्याचा रंग आता बदलण्याची शक्यता असून, लवकरच मनसेचा नवा ध्वज केशरी किंवा भगव्या रंगाचा दिसणार आहे.   


शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून दुरावा होऊन राज्यातील महायुती मोडीत निघाली आहे. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आहे. तर छोटे मित्रपक्ष वगळता भाजपाकडे मित्रपक्ष राहिलेले नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेचा हिंदुत्ववादी मतदार हा नाराज झालेला असण्याची शक्यता आहे. या मतदाराला आपल्याकडे वळवण्यासाठी राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा उचलण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाबाबत मनसेने घेतलेली भूमिकासुद्धा मवाळ होण्याची शक्यता आहे. 23 जानेवारी रोजी मुंबईतील गोरेगाव येथे होणाऱ्या महाअधिवेशनात मनसेप्रमुख राज ठाकरे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.  त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारणात नवी समीकरणे अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत.  

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली होती. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. मात्र शिवसेनेप्रमाणे कट्टर हिंदुत्ववादी भूमिका न घेता राज ठाकरे यांनी मनसेला सर्वसमावेशक रूप देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुरुवातीचा काळ वगळता मनसेला फार यश मिळाले नव्हते. 

दरम्यान, शिवसेनेने दिलेला धक्का भाजपाच्या जिव्हारी लागल्याने भाजपा नेते राज्यात नव्या मित्रपक्षाच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे.  याचाच प्रत्यय पालघरमधील वाडा पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी दिसून येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकाच बॅनरवर फोटो झळकल्याने राजकीय चर्चेला उधाण आले होते. पालघरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ७ जानेवारी याठिकाणी मतदान होणार आहे. वाडा पंचायत निवडणुकीच्या भाजपा उमेदवाराने बॅनरवर राज ठाकरेंचे फोटो लावल्याने भाजपा-मनसे यांच्यात राज्यात जवळीक वाढणार का? असा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित झाला होता. 

Web Title: The color of the MNS flag will change? Will Raj Thackeray make a big decision on the party's move

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.