निनाद देशमुख पुणे : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र, तसेच राज्य स्तरावरील यंत्रणेसोबत लष्करी यंत्रणाही सज्ज आहे. सर्व यंत्रणा एकत्र काम करीत आहेत. देशातील लष्कराच्या रुग्णालयातही कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध केली आहे, अशी माहिती इंटिग्रेटेड डिफेन्स सर्व्हिसेस मेडिकलच्या उपप्रमुख लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी ‘लोकमत’ला दिली. डॉ. कानिटकर यांनी काही दिवसांपूर्वीच लेफ्टनंट जनरल पदाची सूत्रे स्वीकारली होती. या पदावर निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या तर देशातील तिसऱ्या महिला ठरल्या होत्या.
सध्या देशात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. चीन तसेच इतर देशांतून लष्कराच्या साह्याने भारतीय नागरिकांना देशात आणले जात आहे. या नागरिकांसाठी अनेक कॅम्प लष्करातर्फे लावण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी लष्कराने केलेल्या तयारीची माहिती देताना कानिटकर म्हणाल्या की, नागरिकांनी कोरोनाची भीती बाळगायची गरज नाही. आपल्याकडे स्वाइन फ्ल्यूसारखे अनेक संसर्गजन्य आजार आले आणि गेले; मात्र त्यासाठी पॅनिक होण्याची गरज नाही. भारतीय जवानांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता उपाययोजना करण्यात येत आहेत.योग्यता व शिक्षण महत्त्वाचेलष्करात येणाºया मुलींना संदेश देताना डॉ.माधुरी कानिटकर म्हणाल्या की, हे जग तुझं आहे. अगदी खुशीने ये. आमच्यापेक्षा अधिक सुविधा आता लष्ककरात मिळत आहेत. त्यामुळे तू बिनधास्तपणे ये. लष्करात तर स्त्री किंवा पुरुषापेक्षा तुमची योग्यता आणि शिक्षण असेल तर पुढे जाता येते. त्यासाठी बाईने पुरुषी व्हावं, असं मला अजिबात वाटत नाही.