पुढच्या वर्षी लवकर या! माहेरवाशीण गौराईला श्रीगणेशासह भक्तांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 01:10 AM2020-08-28T01:10:38+5:302020-08-28T01:10:49+5:30

कोरोनाच्या काळातही मुंबईला स्वच्छ ठेवणारे सफाई कर्मचारी आणि गणेशमूर्ती विसर्जन प्रक्रियेत लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आपणहून स्वत: पुढे येत गणेशमूर्तींचे विसर्जन करणारे जीवरक्षक हेच खरे हिरो आहेत

Come early next year! Farewell to devotees with Sriganesha to Mahervashin Gaurai | पुढच्या वर्षी लवकर या! माहेरवाशीण गौराईला श्रीगणेशासह भक्तांचा निरोप

पुढच्या वर्षी लवकर या! माहेरवाशीण गौराईला श्रीगणेशासह भक्तांचा निरोप

Next

मुंबई : गणरायापाठोपाठ चार दिवसांनी घरोघरी आलेल्या माहेरवाशीण गौराई व गणपतीचे गुरुवारी भाविकांनी साश्रुनयनांनी विसर्जन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावर्षी शांततेतच विसर्जन सोहळा पार पडला. यावेळी भाविकांनी कृत्रिम तलाव व फिरत्या वाहनांवरील विसर्जन व्यवस्थेला प्राधान्य दिले.

विघ्नहर्ता गणरायापाठोपाठ माहेरवाशीण म्हणून ज्येष्ठा गौरींचे मंगळवारी आगमन झाल्याने घरोघरी उल्हास आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. माहेरी आलेल्या गौराईला विविध अलंकार व वस्त्रांनी नटवून घरातील स्त्रियांनी तिचे पूजन केले. दोन दिवस माहेरी आलेल्या गौरीला गोड-तिखटाचा नैवेद्य दाखवून तिचा पाहुणचार करण्याची प्रथा आहे. त्यामुळे कोरोनारूपी संकटाच्या काळातही घरोघरी उत्साह दिसून येत होता.

दरम्यान, बुधवार रात्रीपर्यंत १९ हजार ८० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यापैकी ५१८ सार्वजनिक व १८५४९ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये कृत्रिम तलावात पाच सार्वजनिक आणि दहा हजार २९१ घरगुती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गुरुवारी गौरीसह सहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. संध्याकाळपर्यंत ४५ सार्वजनिक, ४६८२ घरगुती गणेशमूर्ती आणि ६०८ गौरींचे विसर्जन झाले. यापैकी २७१४ गौरी-गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात झाले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणेशोत्सवात गर्दी होऊ नये यासाठी महापालिकेने विशेष काळजी घेतली़ ठिकठिकाणी पथके ठेवून कारवाई करण्यात आली.

हे आहेत खरे हिरो!
आपल्याला असे वाटते किंवा भासते, की चित्रपटात दिसणारेच खरे हिरो असतात. प्रत्यक्षात तसे नसते. तर कोरोनाच्या काळातही मुंबईला स्वच्छ ठेवणारे सफाई कर्मचारी आणि गणेशमूर्ती विसर्जन प्रक्रियेत लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आपणहून स्वत: पुढे येत गणेशमूर्तींचे विसर्जन करणारे जीवरक्षक हेच खरे हिरो आहेत; आणि हे त्यांचे काम पाहिल्यानंतर लक्षात येते.

1) कुर्ला पश्चिमेकडील श्रीछत्रपती शिवाजी महाराज तलाव येथे आजघडीला एल वॉर्डअंतर्गत ६० जीवरक्षक आणि २० सफाई कर्मचारी नेमण्यात आले आहेत. सायबू गाडगे नावाचा तरुण या जीवरक्षकांसह सफाई कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करत असून, गणेशोत्सव सुरू झाल्यापासून हे खरे हिरो आपले कर्तव्य कुठलाच गाजावाजा न करता पार पाडत आहेत.

2) दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन असो, पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन असो किंवा गौरी गणपतीचे विसर्जन असो; या प्रत्येक प्रक्रियेत हे जीवरक्षक आपले काम इमाने इतबारे करत आहेत. तैनात पोलिसांना मदत करत आहेत. गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी घेऊन येणाºया गणेशभक्तांना मदत करत आहेत.

3) कोणताच गणेशभक्त गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी थेट तलावात उतरणार नाही याची काळजी घेत आहेत. विसर्जनादरम्यान कुठलीच अडचण येणार नाही याची खबरदारी घेत आहेत. २० सफाई कर्मचारी येथील परिसर कसा स्वच्छ राहील? याकडे लक्ष देत आहेत. जंतुनाशकाच्या फवारणीसह निर्माल्यही खाली पडलेले दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.

4) तलावास दोन प्रवेशद्वार असून, शीतल सिनेमा गृहालगतच्या प्रवेशद्वारावर ४० जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. येथे ३ जर्मन तराफे आहेत. १ मोटरबोट आहे. मगन नथुराम मार्गावरील प्रवेशद्वारावर २० जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. येथे २ जर्मन तराफे आहेत आणि २० सफाई कर्मचारी पूर्ण तलावासह भोवती कार्यरत असून, कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य चोख बजावत आहेत.

Web Title: Come early next year! Farewell to devotees with Sriganesha to Mahervashin Gaurai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.