शिकायचे तर तुम्हीच पुढे या! गुरुजींना नाही वेळ, शिक्षण संचालकांची निरक्षरांना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:48 PM2023-11-27T12:48:29+5:302023-11-27T12:48:43+5:30
Mumbai: नव भारत साक्षरता मोहिमेला राज्यात दोन वर्षे लोटली तरी अपेक्षित काम झालेले नाही. शिक्षकांनी निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकल्यामुळे प्रशासनही हतबल आहे.
मुंबई/यवतमाळ : नव भारत साक्षरता मोहिमेला राज्यात दोन वर्षे लोटली तरी अपेक्षित काम झालेले नाही. शिक्षकांनी निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकल्यामुळे प्रशासनही हतबल आहे. अखेर आता प्रौढ निरक्षरांनीच स्वत: शाळांमध्ये जाऊन नाव नोंदणी करावी, असे आवाहन करणारे पत्र शिक्षण (योजना) संचालक डाॅ. महेश पालकर यांनी शुक्रवारी जारी केले आहे. निरक्षर व स्वयंसेवकांची लगतच्या शाळेकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रौढ निरक्षर देशात संख्या २५ कोटी ७८ लाख
१ कोटी ६३ लाख महाराष्ट्रात (२०११ च्या जनगणनेनुसार)
एप्रिल २०२२ ते मार्च २०२७- नव भारत साक्षरता कार्यक्रम कालावधी
नोंदणी स्थिती १२,४०००० निरक्षर नोंदणीचे यंदाचे उद्दिष्ट
५०,००० प्रौढांची नोव्हेंबर अखेरीस ॲपवर नोंदणी
महात्मा फुले यांनी १८५५ मध्ये पुण्यात रात्रशाळा सुरू करून प्रौढ शिक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. त्यांच्या पुण्यतिथीदिनी आपण राज्यात १०० टक्के साक्षरता प्राप्त करण्याचा संकल्प करूया.
- डाॅ. महेश पालकर,
शिक्षण संचालक (योजना)
समाजातील शिक्षित वेळ देऊ शकतात, अशांनी लगतच्या शाळेकडे स्वयंस्फूर्तीने विनामोबदला काम करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.