आला पावसाळा ‘मेकअप’ सांभाळा! पावसाळी सौंदर्यावर ३,००० रुपयांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 12:10 PM2023-06-22T12:10:41+5:302023-06-22T12:11:12+5:30

मुंबई : आधुनिक काळात तब्येतीसोबतच मान्सूनमध्ये मेकअपचीही विशेष काळजी घ्यावी लागते. कलाकारांसोबतच करिअर ओरिएन्टेड स्त्रिया, शाळा-कॉलेजमधील तरुणी आणि गृहिणींनाही ...

Come monsoons take care of 'makeup'!, spend Rs 3,000 on monsoon beauty | आला पावसाळा ‘मेकअप’ सांभाळा! पावसाळी सौंदर्यावर ३,००० रुपयांचा खर्च

आला पावसाळा ‘मेकअप’ सांभाळा! पावसाळी सौंदर्यावर ३,००० रुपयांचा खर्च

googlenewsNext

मुंबई : आधुनिक काळात तब्येतीसोबतच मान्सूनमध्ये मेकअपचीही विशेष काळजी घ्यावी लागते. कलाकारांसोबतच करिअर ओरिएन्टेड स्त्रिया, शाळा-कॉलेजमधील तरुणी आणि गृहिणींनाही पावसाळ्यात मेकअपची चिंता सतावते, पण सध्या पावसाळ्यातही चेहरा सुंदर ठेवणारी प्रसाधने उपलब्ध असल्याने फार काळजी करावी लागत नाही. ३००० ते ३५०० रुपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी असेल तर पावसाळ्यातही चेहरा खुलून दिसू शकतो.

मान्सूनमध्ये थोडा वेगळा मेकअप करावा लागतो. कधी पाऊस येईल याचा नेम नसतो. छत्री किंवा रेनकोट असूनही सोसाट्याचा वारा मेहनतीने आणि वेळ देऊन केलेल्या मेकअपवर पाणी फिरवितो. यासाठी मेकअप करताना विशेष काळजी घेण्याची गरज असते, तसेच मेकअप खूप सांभाळावा लागतो. वेळोवेळी टचअप करावे लागते. यासाठी वॉटरपूफ सौंदर्य प्रसाधने वापआवीत. सर्वप्रथम प्रायमर लावून त्यावर कमी प्रमाणात फाउंडेशन लावावे. हाताने जितके मिक्स करता येईल तितकेच फाउंडेशन लावले, तर पाण्यातही मेकअप पसरत नाही. 

जास्त बेस पाण्यात क्रॅक होतो आणि मेकअप पॅची दिसण्याची भीती असते. हलके फाउंडेशन करून एकजीव केले तर स्थिर राहते. त्यावर मेकअप फिक्सर लावून १०-१५ मिनिटे सुकू द्यावे. फाउंडेशनवर मेकअप फिक्सर लावून हलक्या हाताने स्पंज फिरवावा. त्यामुळे फाउंडेशन फिक्स होईल. फायनल मेकअप झाल्यावर पुन्हा असेच करावे. सर्वसाधारणपणे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी मेकअप करण्याची अशी प्रक्रिया आहे. महिलांसाठी वॉटरप्रूफ मस्करा आणि लायनर लावावा लागतो. पावसाळ्यात आयशॅडो पसरण्याची भीती असल्याने त्याचा अत्यंत कमी प्रमाणात वापर करावा. मान्सूनमध्ये वॉटरप्रूफ मॅट लिपस्टिकला प्राधान्य द्यावे.

असे लावावे काजळ

पावसाळ्यात डोळ्यांतील पाणी साफ करून काजळ लावायला हवे. ईअरबड्सने काजळ मिक्स करून घेतल्यास खूप वेळ राहते. यूट्युबवरील काही टिप्सचाही फायदा होऊ शकतो.

रात्रीच्या वेळी मॉश्चरायजर लावाले, तर होतो फादा
- फाउंडेशनमध्येच ब्लश ऑन केले तर ते जास्त वेळ टिकते. अशा प्रकारे केलेला मेकअप दोन-तीन तास टिकतो. त्यानंतर पावसात भिजल्यास केवळ टचअप करावा लागतो. 
- पावसात किती वेळ चेहरा भिजतो यावरही मेकअपचे गणित आधारलेले असते. पावसाळ्यात रात्रीच्या वेळी मॉश्चरायजर लावले तर चांगला फायदा होतो.

इतका होतो खर्च... 
पावसाळी मेकअपसाठी वेगवेगळ्या किमतींमध्ये विविध ब्रँड्सची सौंदर्यप्रसाधने बाजारात आहेत. 
- लिक्विड फाउंडेशन : १६००
- मस्करा : ४८० ते ६०० 
- जेल लायनर : ५५० ते ६००
- काजळ : ५५०
- लिपस्टिक : ७०० 
- फिक्सर : १५००

मी २३ वर्षांपासून प्रसाद ओक, भार्गवी चिरमुले, प्रथमेश परब, पुष्कर श्रोत्री अशा बऱ्याच सेलिब्रिटीजना मेकअप करत आहे. सर्वसामान्य तरुणतरुणी व स्त्रियांनी मेकअपकडे विशेष लक्ष दिले तर पावसाळ्यातही त्यांचा चेहरा सुंदर दिसू शकतो. पावसाळ्यात योग्य काळजी घेऊन मेकअप केला तर फायदेशीर ठरतो.     - संतोष शर्मा, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट

Web Title: Come monsoons take care of 'makeup'!, spend Rs 3,000 on monsoon beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.