पुढच्या वर्षी लवकर या !

By admin | Published: September 12, 2016 03:43 AM2016-09-12T03:43:46+5:302016-09-12T03:43:46+5:30

लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट बघता बघता, बाप्पाच्या निरोपाचाही दिवस केव्हा येऊन ठेपला हे कळलेही नाही! रविवारी सात दिवसांच्या वास्तव्यानंतर गणपतींचे

Come on next year! | पुढच्या वर्षी लवकर या !

पुढच्या वर्षी लवकर या !

Next

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट बघता बघता, बाप्पाच्या निरोपाचाही दिवस केव्हा येऊन ठेपला हे कळलेही नाही! रविवारी सात दिवसांच्या वास्तव्यानंतर गणपतींचे वाजत-गाजत मिरवणुकीने, मात्र जड अत:करणाने भक्तगणांनी विसर्जन केले. बाप्पाला निरोप देताना गणपती बाप्पाच्या जयघोषात ‘पुढच्या वर्षी लवकर या!’ असे सांगायला मात्र लहानथोर विसरले नाहीत.
बाप्पाचा निरोप घेण्यापूर्वी भक्तगणांनी बाप्पाची विधिवत उत्तरपूजा, आरती केली. त्यानंतर विसर्जन करण्यासाठी बाप्पाची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.
लहान मुले ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी कळकळीची विनवणी लाडक्या बाप्पाला करत होते. विसर्जनस्थळी नेल्यावर पुन्हा पूजा, आरती व त्याला नैवेद्य दाखवल्यानंतर बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. शहर-उपनगरांतील सर्व विसर्जन स्थळांवर भाविकांनी गर्दी केली केली होती. सर्व बाजारपेठ, तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. पावसाने विश्रांती घेतल्याने विसर्जन मिरवणूक अगदी सुरळीत पार पडली.


मुंबईकरांची कृत्रिम तलावांना पसंती
गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांत करा, या महापालिकेच्या आवाहनाला मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. दीड, पाच, सहा आणि सातव्या दिवशी मुंबईकर गणेशभक्तांनी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांत करण्यावर भर दिला आहे. परिणामी मुंबईकरांचा यंदा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल असल्याचे चित्र आहे. २०१५ साली कृत्रिम विसर्जनस्थळांची संख्या २६ होती. गेल्या वर्षी कृत्रिम तलावांत २५ हजार ४५३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यावर्षीही पर्यावरण संवर्धनाचे आवाहन महापालिकेने केले होते. यावर्षीही गणेशोत्सवात पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची मुंबई महापालिका अधिकाधिक खबरदारी घेत आहे.

Web Title: Come on next year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.