पुढच्या वर्षी लवकर या!
By admin | Published: September 10, 2014 12:02 AM2014-09-10T00:02:26+5:302014-09-10T00:02:26+5:30
जिल्ह्णात कुठेही अनुचीत प्रकार न घडता गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजरात भक्तांनी आपल्या बाप्पाचे विसर्जन केले
पालघर :जिल्ह्णात कुठेही अनुचीत प्रकार न घडता गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजरात भक्तांनी आपल्या बाप्पाचे विसर्जन केले.
पालघर पोलीस स्टेशन अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव २९ तर खाजगी ६५ मुर्त्या तर सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत २६ सार्वजनिक तर ३४ खाजगी मुर्त्यांच्या विसर्जनासाठी संध्याकाळी पाच वाजल्यापासून मंडळाची लगबग सुरू झाली होती. यावेळी गणेशमंडळाच्या स्वागतासाठी विविध राजकीय पक्ष व पालघर नगरपरिषदांनी आपले स्वागतकक्ष उभारले होते. प्रत्येक मंडळाचे हार फुलानी स्वागत करून त्यांना स्मृतिचिन्हांचे वाटप केले जात होते. पालघर मधील गणेशकुंडात सर्व मुर्त्यांचे विसर्जन करण्यात येणार असल्याने नगरपरिषदेने स्वयंसेवकांसह सर्व व्यवस्था चोख ठेवली होती. तर सातपाटी व संंबंधीत गावातील गणेश मुर्त्यांचे विसर्जन समुद्रात करण्यात येत असल्याने काही मच्छीमारांनी आपल्या बोटीची व्यवस्था विनामुल्य केली होती. संपुर्ण पालघर जिल्ह्णातील विसर्जनाचा हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधिक्षकांच्या सुचनेनुसार १ अप्पर पोलीस अधिक्षक, ५ पोलीस उपअधिक्षक, १४० पोलीस निरिक्षक, सहा. पो. नि. पोलीस उपनिरिक्षक, १३९५ पोलीस कर्मचारी, ११० महिला पोलीस, ४०० होमगार्ड, १०० महिला होमगार्ड व १ राज्य राखीव दलाचे प्लॅटन इतका बंदोबस्त चोख रितीने आपली ड्युटी पार पाडल्याचे कुठलाही अनुचीत प्रकार न घडता हा विसर्जनसोहळा पार पडला.