Join us

वक्त पे आए, वह भी दुरुस्त आए...

By admin | Published: April 12, 2015 2:32 AM

येमेनमध्ये यादवी उफाळल्यानंतर भारतीय नागरिकांच्या मनामध्ये आता मायदेशात पुन्हा जायला मिळणार की नाही याची चिंता सुरू झाली.

आॅपरेशन राहत : जीवन-मृत्यूतील एका श्वासाचं प्रत्यंतर, साडेचार हजार लोकांची सुटकाओंकार करंबेळकर - मुंबईयेमेनमध्ये यादवी उफाळल्यानंतर भारतीय नागरिकांच्या मनामध्ये आता मायदेशात पुन्हा जायला मिळणार की नाही याची चिंता सुरू झाली. त्यापेक्षाही आपण जिवंत तरी राहणार का, असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये येऊ लागले. सौदीच्या हस्तक्षेपानंतर मात्र भारताने वेगाने पावले उचलली आणि ‘आॅपरेशन राहत’ ही अभूतपूर्व मोहीम यशस्वी केली. सुमारे साडेचार हजार लोकांना एका आठवड्याच्या आत येमेनमधून सोडवून संपूर्ण जगाला आपल्या क्षमतेचा परिचय दिला. सुटका झालेल्यांनी घेतले ते जीवन आणि मृत्यू दरम्यानच्या निव्वळ एका श्वासाचे प्रत्यंतर!भारताच्या या धाडसी मोहिमेचे संपूर्ण जगात केवळ कौतुकच झाले नाही, तर अनेक देशांनी त्यांचे नागरिक सोडविण्यासाठी भारताकडे मदत मागितली. परराष्ट्र मंत्रालय, वायूदल, नौदल आणि एअर इंडिया यांच्या संयुक्त मोहिमेसाठी येमेनमधील भारतीयांनी मनोमन कृतज्ञताही व्यक्त केली.एअर इंडियाच्या या धाडसी मोहिमेच्या काळात सना व आखाती परिसरात वाळूचे वादळ आल्याने दृश्यता कमी झालेली होती आणि युद्धामुळे सनामधील नेव्हिगेशन एड्सही व्यवस्थित कार्यरत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एअर इंडियाच्या वैमानिकांनी जिवाची पर्वा न करता भारतीयांना सुखरूप मायदेशी आणले.एअर इंडियाचे ओमान कंट्री मॅनेजर बी. के. कुलकर्णी यांचे येमेनमधील यादवी, आॅपरेशन राहत याबद्दलचे अनुभव... द ग्रेट एस्केप... आजच्या मंथनमध्ये!युद्धजन्य स्थितीमध्ये जिबोटी ते सना अशी उड्डाणे करणे अत्यंत अवघड होते. बॉम्बिंगचा काळ वगळता काही ठरावीक दोन-तीन तासांचे विंडो पीरिअड्स भारतीय विमानांना सौदी अरेबियाने उपलब्ध करून दिले होते. त्याच वेळामध्ये तसेच सौदीने दिलेल्या वेळेतच उड्डाण करून नागरिकांची सुटका करावी लागत असे. जिवाची पर्वा न करता भारतीय नागरिकांना जिबोटीपर्यंत आणणाऱ्या एअर इंडियाच्या वैमानिकांच्या अतुलनीय कौशल्याला दाद देताना सुटका झालेल्या भारतीयांनी विमान हवेत झेपावताच अक्षरश: टाळ््यांचा कडकडाट केला.