मदत मागायला येता, मतदानाला का येत नाही? राज ठाकरेंचा जनतेला परखड सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 01:22 PM2023-06-11T13:22:18+5:302023-06-11T13:23:52+5:30

आज मनसे साधन सुविधा विभागाचा पाचवा वर्धापन दिन झाला. या कार्यक्रमासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते.

Come to ask for help, why not come to vote? Raj Thackeray's tough question to the public | मदत मागायला येता, मतदानाला का येत नाही? राज ठाकरेंचा जनतेला परखड सवाल

मदत मागायला येता, मतदानाला का येत नाही? राज ठाकरेंचा जनतेला परखड सवाल

googlenewsNext

आज मनसे साधन सुविधा विभागाचा पाचवा वर्धापन दिन झाला. या कार्यक्रमासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील नद्यावरुन तसेच या वर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली. यावर त्यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचा सल्ला दिली. प्रशासनाच्या साधन सुविधेवरुनही ठाकरे यांनी सरकारला सुनावलं. 

कमी कसले होतेय, या राज्यात पेट्रोल, डिझेल महागले; दर ९० पैशांनी वाढले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, या सगळ्या विंग आपण पक्षामध्ये वेगवेगळ्या शाखा सुरू केल्या. आपत्कालीन व्यवस्थापन पथकही स्थापन केले. या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून मी ब्लू प्रिंट आणली होती. तो या सगळ्या योजनांचा भाग होता. समाजामधील वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करणे गरजेचे आहे. आपण अग्निशमन तलाच कौतुक केलं पाहिजे. 'प्रत्येकवेळी कामाला मनसेला धावून येते, मदत मागायला येता, मतदानाला का येत नाही? असा परखड सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला.


राज ठाकरे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत मनसेच मदतीला येते.  कोकणात यंदा मोठी गरज लागेल. दरडी कोसळु शकतात. मुंबईत नाले तुंबतायत कशाला, कोणामुळे तुंबतायत याचा सोध गेतला पाहिजे. राज्याच्या बाहेरचे लोक येणार, नद्या-नाल्यांच्या बाजुने बसणार, झोपड्या उभारणार. मुंबईत तीन नद्या होत्या. त्यापैकी मिठी नदी राहिली आहे. पण तुम्हाला माहितीय का, मुंबईत पाच नद्या होत्या. त्यापैकी चार मारून टाकल्या, मुंबईला पाईपलाईनच्या बाजुला कित्येक हजारो झोपड्या आहेत. कारण पालिकेचे लक्ष नाही, आमदारांचे नाही, मतासाठी सगळे चालते, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. 

बिहेरमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी कोसळलेल्या पुलारुनही ठाकरे यांनी टीका केली. ठाकरे म्हणाले, हा पूल कोसळेल म्हणून एका पत्रकाराने एक वर्षापूर्वी सांगितले होते. पण, त्याच्याकडे लक्ष न देता त्या अटक केली. खरतर हा पूल सुरू झाल्यानंतर कोसळला असता तर किती मोठं नुकसान झालं असते, असंही ठाकरे म्हणाले. 

Web Title: Come to ask for help, why not come to vote? Raj Thackeray's tough question to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.