सच्चा हिंदुत्ववादी अन् कडवट शिवसैनिकाचे मनोगत ऐकण्यासाठी मेळाव्याला आवर्जून या; एकनाथ शिंदेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 10:29 PM2022-10-02T22:29:19+5:302022-10-02T23:20:43+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बीकेसी मैदान येथे होणाऱ्या शिवसेनेच्या भव्य दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला.

Come to the Dasara Melava to listen to the true Hindutva and bitter Shiv Sainik; CM Eknath Shinde's appeal | सच्चा हिंदुत्ववादी अन् कडवट शिवसैनिकाचे मनोगत ऐकण्यासाठी मेळाव्याला आवर्जून या; एकनाथ शिंदेंचं आवाहन

सच्चा हिंदुत्ववादी अन् कडवट शिवसैनिकाचे मनोगत ऐकण्यासाठी मेळाव्याला आवर्जून या; एकनाथ शिंदेंचं आवाहन

googlenewsNext

मुंबई- यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्हीं गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. 

'बाळासाहेबांचा फोटो अन् भगवे झेंडे, दु:ख होतंय'; रामदास कदम यांच्या विधानाची रंगली चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बीकेसी मैदान येथे होणाऱ्या शिवसेनेच्या भव्य दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवसैनिक मेळाव्यासाठी येणार असून त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी व्यक्तीशः कामाचा आढावा घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच आम्ही सारे विचारांचे वारसदार असून एका सच्चा हिंदुत्ववादी कडवट शिवसैनिकाचे मनोगत ऐकण्यासाठी बीकेसी मैदानावर आवर्जून या असे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. तसेच शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी इथे आण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर-

निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह शिवसेनेने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील सभेचे जुने फोटो दिसून येतात. त्यामध्ये, बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करतानाचे छायाचित्र आहे. तसेच, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या आवाजातील उद्धव ठाकरेंचा संवाद, त्यांच्या सभांचे व्हिडिओ आणि डौलात फडकणारा भगवा ध्वज दिसून येत आहे. एकीकडे शिंदे गटाने टिझर लाँच केल्यानंतर आता ठाकरे गटानेही टिझर लाँच करत निष्ठेचा सागर उसळणार असल्याचे म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Come to the Dasara Melava to listen to the true Hindutva and bitter Shiv Sainik; CM Eknath Shinde's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.