आ. ह. साळुंखेंचा पुरंदरे यांच्या पुरस्काराला विरोध
By admin | Published: August 17, 2015 01:02 AM2015-08-17T01:02:13+5:302015-08-17T01:02:13+5:30
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदेर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास ज्येष्ठ इतिहासकार आ. ह. साळुंखे यांनीही या पुरस्काराला विरोध केला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड
मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदेर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास ज्येष्ठ इतिहासकार आ. ह. साळुंखे यांनीही या पुरस्काराला विरोध केला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेचे स्वागत करीत त्यांची पाठराखण केली आहे.
भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील बराच मोठा भाग एकांगी, एकतर्फी आणि वर्चस्ववादी वृत्तीने लिहिल्याचे आढळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासांचे लेखन ज्यांनी केले आहे, त्यांच्यापैकी अनेकांचे लेखन वर्चस्ववादातून झाले आहे. तसेच हे लिखाण दोषांनी डागाळलेले असल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे. तर चिकित्सक आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन यांच्या आधारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या इतिहासलेखनाविषयी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेचे
स्वागत करतो आणि आव्हाड यांना शुभेच्छा देतो, असेही साळुंखे यांनी म्हटले आहे.