दिलासा ! राज्याच्या दैनंदिन मृत्यूसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:07 AM2021-07-27T04:07:06+5:302021-07-27T04:07:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यानंतर राज्यात पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूसंख्येत मोठी घट झाल्याची नोंद झाली आहे. ...

Comfort! Decline in the state's daily mortality | दिलासा ! राज्याच्या दैनंदिन मृत्यूसंख्येत घट

दिलासा ! राज्याच्या दैनंदिन मृत्यूसंख्येत घट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यानंतर राज्यात पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूसंख्येत मोठी घट झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात सोमवारी ४ हजार ८७७ रुग्ण आणि ५३ मृत्यूंची नोंद झाली आहे. दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून, दिवसभरात ११ हजार ७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ६० लाख ४६ हजार १०६ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णही कमी झाले असून, सध्या ८८ हजार ७२९ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६९ लाख ९५ हजार १२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख १ हजार ७५८ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर ३ हजार ५१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४३ टक्क्यांवर पोहोचले असून मृत्यूदर २.०९ टक्के आहे. राज्यात पुण्यात १५ हजार ५५०, ठाण्यात ११ हजार ३२१, मुंबईत ७ हजार १८६, कोल्हापूरमध्ये १० हजार ३२२ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ५३ मृत्यूंमध्ये मुंबई ८, ठाणे १, नवी मुंबई मनपा ३, वसई विरार मनपा ३, पनवेल मनपा १, जळगाव २, पुणे १, सोलापूर २, सातारा ६, कोल्हापूर ९, कोल्हापूर मनपा २, सांगली ३, सांगली मिरज कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग ४, रत्नागिरी २, बीड ३, अकोला १ इ. रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Comfort! Decline in the state's daily mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.