मुंबई : मुंबईत गेल्या २४ तासांत एक हजार ५४४ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ६० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे तर दोन हजार ४३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सहा लाख ८८ हजार ६९६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार २६० जणांचा मृत्यू झाला असून, सहा लाख ३६ हजार ७५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३५ हजार ७०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के इतका आहे. ९ मे ते १५ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.२९ टक्के असून, मुंबईतील दुपटीचा दर २३१ दिवस झाला आहे. तसेच मुंबईत सक्रिय कंटेन्मेंट झोन ८६ आहे तर सक्रिय सीलबंद इमारती ३३९ इतक्या आहेत.
मुंबईत दिवसभरात २२ हजार ४३० कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून, आतापर्यंत ५८ लाख ९८ हजार ५०६ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान, आज नोंद झालेल्या ६० मृत्यूंपैकी ३५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ३३ रुग्ण पुरुष आणि २७ रुग्ण महिला होत्या. तीन रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते तर ३८ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते आणि उर्वरित १९ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.