दिलासादायक! मॉल्स, बाजार संकुले आजपासून उघडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 05:49 AM2020-08-05T05:49:25+5:302020-08-05T05:49:50+5:30

मिशन बिगिन अगेन; काही क्रीडा प्रकारांना मुभा, रेस्टॉरंट, थिएटर आणि फूडकोर्ट मात्र बंदच राहणार

Comfortable! Malls, market complexes will open from today | दिलासादायक! मॉल्स, बाजार संकुले आजपासून उघडणार

दिलासादायक! मॉल्स, बाजार संकुले आजपासून उघडणार

Next

मुंबई : राज्य शासनाने लॉकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत वाढविला असला तरी मिशन बिगीन अगेन अंतर्गत दिलेल्या काही सवलतींची अंमलबजावणी बुधवारपासून होत आहे. त्यानुसार, मॉल, बाजार संकुले, काही ठराविक क्रीडा प्रकार सुरू होतील.

मॉलमधील दुकाने उघडण्याची परवानगी दिली तरी रेस्टॉरन्ट, थिएटर आणि फुडकोर्ट हे बंदच राहतील. रेस्टॉरन्ट आणि फुडकोर्ट हे होम डिलिव्हरी करू शकतील. मात्र, त्यांना सोशल डिस्टंन्सिंग आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. असांघिक (वैयक्तिक) खेळ, गोल्फ कोर्स, फायरिंग रेंज, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब आणि आऊटडोर जिम्नॅस्टिक या क्रीडाप्रकारांना परवानगी दिली आली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीने जाणाऱ्यांना ई पास लागणार नाही. खासगी वाहनांनी जाणाऱ्यांना तो अनिवार्य असेल.

केवळ होम डिलिव्हरीला परवानगी
रेस्टॉरन्ट बंदच राहतील पण त्यांना पूर्वीप्रमाणे
होम डिलिव्हरी देता येईल. टॅक्सी, कॅब, अन्य चारचाकींमध्ये चालक अधिक तीन जणांना वाहतुकीची परवानगी राहील. रिक्षामध्ये चालक अधिक दोन प्रवासी असतील तर दुचाकी वाहनावर दोघांना जाण्याची अनुमती असेल. हेल्मेट आणि मास्क घालणे अनिवार्य असेल. या आधी दुचाकीवर एकालाच परवानगी होती. शासकीय व खासगी कार्यालयांमधील उपस्थिती व इतर नियम पूर्वीप्रमाणेच कायम असतील.

मुंबईत ७०% दुकाने होणार सुरू
मुंबई पालिकेने बुधवारपासून सर्व दुकाने ९ ते ७ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी सांगितले की, मुंबईत एकूण तीन ते साडेतीन लाख दुकाने आहेत. त्यापैकी दोन ते सव्वादोन लाख म्हणजे सुमारे ७० टक्के दुकाने खुली राहतील. लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान, कामगारांना पगार देण्यास पैसे नसल्याने काही दुकानदार दुकाने सुरू करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Comfortable! Malls, market complexes will open from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.