दिलासादायक, मुंबईतील पिण्याचे पाणी ९९.३४ टक्के शुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:05 AM2021-03-08T04:05:49+5:302021-03-08T04:05:49+5:30

१ लाख ७५ हजार ठिकाणी गळतीची दुरुस्ती; वरळी, घाटकोपर, चेंबूरच्या झोपडपट्टी भागातील नमुन्यांच्या तपासणीअंती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...

Comfortable, Mumbai's drinking water is 99.34 percent pure | दिलासादायक, मुंबईतील पिण्याचे पाणी ९९.३४ टक्के शुद्ध

दिलासादायक, मुंबईतील पिण्याचे पाणी ९९.३४ टक्के शुद्ध

Next

१ लाख ७५ हजार ठिकाणी गळतीची दुरुस्ती; वरळी, घाटकोपर, चेंबूरच्या झोपडपट्टी भागातील नमुन्यांच्या तपासणीअंती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईचे पाणी अशुद्ध असल्याची ओरड अनेकदा करण्यात येते. मात्र यात काहीही तथ्य नसल्याचे समाेर आले आहे. आजवर केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईच्या पाण्याच्या शुद्धतेत ९९.३४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

पंतप्रधान जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्राहक व्यवहार मंत्रालय यांच्यातर्फे देशातील २१ शहरांमध्ये नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने गोळा करून तपासण्यात आले. याअंतर्गत मुंबईतील वरळी, करीरोड, शिवडी, मालाड, कांदिवली, जोगेश्वरी, पवई, साकीनाका, घाटकोपर, चेंबूर येथील झोपडपट्टीच्या भागातून पाण्याचे नमुने गोळा केले हाेते. तपासणीअंती मुंबईतील पिण्याचे पाणी ९९.३४ टक्के शुद्ध असल्याचा दावा करण्यात आला.

सन २०१३ - १४ ते २०१९ - २० या कालावधीत जीर्ण झालेल्या विविध व्यासाच्या २५० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. १ लाख ७५ हजार ठिकाणची गळती शोधून दुरुस्ती करण्यात आली. विविध ठिकाणी कामे सुरू असताना रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत ८९ हजर ९०८ जोडण्या बदलण्यात आल्या. विविध जलद बोगद्यांचे काम पूर्ण करण्यात आले. विविध उपाययोजनांमुळे पाण्याच्या शुद्धतेत ९९.३४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

* सुमारे १३० ठिकाणच्या नमुन्यांची तपासणी

दररोज ३८५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. ३५८ ठिकाणी पाण्याचे नमुने गोळा केले जातात. ११० ते १३० ठिकाणाचे नमुने तपासले जातात.

Web Title: Comfortable, Mumbai's drinking water is 99.34 percent pure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.