CoronaVirus : दिलासादायक! सहा कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:36 AM2020-04-28T05:36:49+5:302020-04-28T05:39:35+5:30

आता नायर रुग्णालयानेही यासाठी पुढाकार घेत पहिले प्लाझ्मा फेरेसिस मशीन बसवले आहे.

Comfortable! Plasma therapy on six corona patients | CoronaVirus : दिलासादायक! सहा कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी

CoronaVirus : दिलासादायक! सहा कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी

Next

मुंबई : कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत शहर-उपनगरात सहा कोरोना रुग्णांवर या थेरपीचा वापर करण्यात आला. मुंबईत शनिवारी लीलावती या खासगी रुग्णालयात एका रुग्णावर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले. तर, रविवारी महापालिकेच्या सायन रुग्णालयात दोन आणि सेव्हन-हिल रुग्णालयात तीन रुग्णांवर उपचार करण्यात आले. आता नायर रुग्णालयानेही यासाठी पुढाकार घेत पहिले प्लाझ्मा फेरेसिस मशीन बसवले आहे.
आगामी काळात प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार केले जातील, अशी माहिती नायरचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिलीे. कोरोनावर यशस्वी मात करत बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरिरात प्रतिपिंडे (अँटिबॉडी) तयार होतात. त्यानुसार त्यांच्या रक्तातील फ्रॅक्शन घेऊन ते दुसºया कोरोनाग्रस्त रुग्णांना दिले जातात. यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. या थेरपीला मान्यता मिळाल्यानंतर पालिकेने तत्काळ याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार बºया झालेल्या रुग्णांशी संपर्क साधत, त्यांच्या रक्ताची तपासणी करून पाच रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. सायनमध्ये दोन तर सेव्हनहिलमध्ये तीन रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यापूर्वी लीलावती रुग्णालयात पहिली, अशी थेरपी करण्यात आल्याची माहिती आहे.
>लवकरच नायरमध्येही उपचार
प्लाझ्मा थेरपी गंभीर रुग्णांसाठी दिलासादायक ठरणार असून यामुळे कोरोनाग्रस्त बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचा विश्वास आता व्यक्त होत आहे. तर कोविड रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आलेल्या नायर रुग्णालयात पहिले फेरेसिस मशीन बसवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया वेगाने करत अधिकाधिक संख्येने रुग्णांवर उपचार करणे शक्य होईल. लवकरच नायरमध्येही या उपचारांना सुरुवात होणार असल्याची माहिती डॉ. जोशी यांनी दिली आहे.
>सव्वाशे ज्येष्ठ नागरिक कोरोनामुक्त
कोरोनाचा सर्वाधिक धोका ६० वर्षांवरील व्यक्तींना असल्याचे दिसून आले आहे. तसेच मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये ज्येष्ठांची संख्या अधिक आहे.
मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे ५५८९ रुग्ण सापडले असून २१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी भयावह स्थिती असताना ९०० हून अधिक रुग्ण या आजारातून बरेही झाल्याचे दिसून आले आहे. मात्र ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. ज्येष्ठांमध्ये वयोमानानुसार रोग प्रतिकार शक्ती कमी असणे, हृदय विकार, श्वसनाचे आजार, कर्करोग, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार असे आजार असल्याने कोरोनाचा धोका त्यांना सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते.
कोरोनाचा धोका असणाºया ज्येष्ठांचा शोध घेण्यासाठी पालिकेने विशेष मोहीमही सुरू केली आहे. या सर्वेक्षणात आॅक्सिजनची पातळी कमी असलेल्यांवर उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, केंद्र, राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू असलेल्या उपचारांमुळे १२५ ज्येष्ठ कोरोनामुक्त झाल्याची माहिती पालिकेच्या एका अधिकाºयाने दिली. चांगले उपचार आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोरोनावर मात करणे शक्य असल्याचे यातून दिसून येते.

Web Title: Comfortable! Plasma therapy on six corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.