Join us

महाडमध्ये कमांडंटला अटक

By admin | Published: December 12, 2014 2:15 AM

महिला कर्मचा:यांशी ईल वर्तन करून त्यांचा वारंवार विनयभंग करणा:या 6क् वर्षीय विकृत कमांडंटला शहर पोलिसांनी गजाआड केले.

विनयभंग : सैनिक रुग्णालयातील प्रकार
महाड : महिला कर्मचा:यांशी ईल वर्तन करून त्यांचा वारंवार विनयभंग करणा:या 6क् वर्षीय विकृत कमांडंटला शहर पोलिसांनी गजाआड केले. महाड शहरातील सैनिक रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. विनयभंगाचे प्रकार उघडकीस आल्यावर पीडित महिलांच्या नातेवाईकांनी या कमांडंटला बेदम चोप दिला व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. लक्ष्मण राम नेहरा (रा. नागोर, जि. जयपूर राजस्थान) असे या आरोपीचे नाव आहे. तो शहरातील काकरतळे परिसरातील निवृत्त कर्मचा:यांच्या रुग्णालयात गेल्या दीड वर्षापासून इनचार्ज म्हणून कार्यरत होता.  
या रुग्णालयात महिला मेडिकल ऑफिसर आहेत. फार्मासिस्ट, नर्सिग असिस्टंट व सफाई कामगार महिलाही रुग्णालयात आहेत. त्यांच्याशी ईल चाळे करून हा कमांडंट त्यांचा छळ करत असे. माझी तक्रार केलीत, तर नोकरीवरून काढून टाकेन, अशी धमकीही लक्ष्मण महिला कर्मचा:यांना देत असे, असे महिला कर्मचा:यांचे म्हणणो आहे.