मुंबई : कामाची व्याप्ती मोठी असल्याने महापालिकेत पुन्हा एकदा कमांडो फोर्स नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. याचे सूतोवाच अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सुरक्षा दलाच्या ५२व्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात केले.पालिकेच्या सुरक्षा दलाचा ५२वा वर्धापन दिन व पारितोषिक वितरण सभारंभ अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांच्या हस्ते भांडुप संकुल येथील सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात पार पडला. या वेळी बोलताना सुरक्षा रक्षकांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. देशाचे संरक्षण करणाºया जवानांप्रमाणे, महापालिकेचा सुरक्षा विभाग पालिकेच्या मालमत्ता व आस्थापनाचे संरक्षण करीत असतो, याचे त्यांनी स्मरण करून दिले.या वेळी त्यांच्या हस्ते सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचाºयांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. महापालिकेचे कार्यक्षेत्र कुलाबापासून तानसा वैतरणा धरणापर्यंत व्यापलेले आहे. पालिकेच्या विविध आस्थापनांचे जतन व संरक्षण करण्याची महत्त्वपूर्ण कामे सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचारी करीत असतात. त्यामुळे हा सुरक्षा विभाग अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले.>हा विभाग सुरक्षेच्या दृष्टीने कर्तव्यनिष्ठेने आपले कर्तव्य पार पाडत आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी राष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये भाग घेऊन विविध पारितोषिके पटकावली आहेत. प्रशासन स्तरावर या विभागात काळानुरूप आवश्यक ते बदल करून, अद्यावत साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे.- डॉ. किशोर क्षीरसागर, उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन४ हजार सुरक्षा कर्मचारी१ मार्च १९६६ मध्ये महापालिकेत सुरक्षा विभाग स्थापन झाला. या विभागात ४ हजार सुरक्षा कर्मचारी व १००पेक्षा अधिक अधिकारी कार्यरत आहेत.सुरक्षा रक्षक पालिकेच्या विविध मालमत्तांबरोबरच रुग्णालये, महाविद्यालय, मलनिस्सारण प्रकल्प, जलाशय आदींचे संरक्षण करतात.
मुंबई सुरक्षा दलात कमांडो फोर्स, विजय सिंघल यांचे सूतोवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 2:02 AM