मुंबई : चतुरंग प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व भावगीत गायक विनायक जोशी यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी स्मरणांजली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी जोशी यांचा प्रवासात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे यंदा त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून अभिवादन देण्यासाठी त्यांच्या गीतांचा स्मरणांजली हा कार्यक्रम यूट्युबवरून प्रसारित करण्यात येणार आहे. जोशी यांच्या प्रयोगशीलतेतून साकारलेल्या सरीवर सरी, बाबुल मोरा, तीन बेगम एक बादशहा, अरुण दाते स्मरणांजली, डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचे चित्रगीत, स्वरभावयात्रा, खेबुडकर, दशरथ पुजारी आणि गीत नवे गाईन मी या कार्यक्रमांमधील निवडक गीतांचे यूट्युबच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात येणार आहे. मंगळवारी साडेनऊच्या सुमारास चतुरंग प्रतिष्ठानच्या यूट्युब चॅनलवर या कार्यक्रमांचे प्रसारण होणार आहे.
तुरंगतर्फे मंगळवारी स्मरणांजली कार्यक्रमाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:07 AM