लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वरळी येथील डॉ. अॅनी बेझेंट मार्गावरील उत्तर वाहिनीवरील लव्ह ग्रोव्ह उड्डाणपुलाचे नादुरुस्त बेअरिंग बदलण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ३ जुलै रोजी सायंकाळी ७ पासून हाती घेतले आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे हा उड्डाणपूल ४ जुलै रोजी वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी घेण्यात आलेला पहिला ट्रॅफिक ब्लॉक संपल्यावर सोमवारी सकाळी उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात येईल. उड्डाणपुलाचे ५१ बेअरिंग बदलण्यात येणार आहेत.
सहा टप्प्यांत काम विभागले आहे. प्रत्येक शनिवार व रविवारी काम हाती घेण्यात येणार असून, वाहतूक पोलिसांनी ट्रॅफिक ब्लॉकला मंजुरी दिली आहे. दरम्यान, नियोजित वेळापत्रकानुसार ८ ऑगस्ट रोजी हे काम पूर्ण होणार आहे.
-----------------
ट्रॅफिक ब्लॉक वेळापत्रक
१० जुलै सायंकाळी ७ पासून ११ जुलैच्या रात्री ११.५९ पर्यंत
१७ जुलै सायंकाळी ७ पासून १८ जुलैच्या रात्री ११.५९ पर्यंत
२४ जुलै सायंकाळी ७ पासून २५ जुलैच्या रात्री ११.५९ पर्यंत
३१ जुलै सायंकाळी ७ पासून १ ऑगस्टच्या रात्री ११.५९ पर्यंत
७ ऑगस्ट सायंकाळी ७ पासून ८ ऑगस्टच्या रात्री ११.५९ पर्यंत