बालवैज्ञानिक पुरस्कार उपक्रमाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:09 AM2021-08-29T04:09:19+5:302021-08-29T04:09:19+5:30

मुंबई : शिशुविहार शाळेमध्ये ताराबाई मोडक बालवैज्ञानिक पुरस्कार उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ऑनलाइन पद्धतीने ...

Commencement of Pediatric Awards | बालवैज्ञानिक पुरस्कार उपक्रमाची सुरुवात

बालवैज्ञानिक पुरस्कार उपक्रमाची सुरुवात

Next

मुंबई : शिशुविहार शाळेमध्ये ताराबाई मोडक बालवैज्ञानिक पुरस्कार उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ऑनलाइन पद्धतीने या उपक्रमाची प्रथम फेरी आयोजित करण्यात आली होती. या फेरीमधून मेरिटप्रमाणे विद्यार्थ्यांची निवड दुसऱ्या फेरीसाठी करण्यात येणार आहे. या उपक्रमात २४ शाळांच्या ६६२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या उपक्रमासाठी शिशुविहार मंडळाचे मान्यवर पदाधिकारी, मुख्याध्यापिका दक्षाबेन चित्रोडा यांनी विशेष मार्गदर्शन केले. दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांनी केलेल्या कृती संशोधनाचे सादरीकरण होणार आहे. या उपक्रमातून भावी वैज्ञानिक तयार करणे हा मुख्य उद्देश आहे.

---------------------

पहिल्या दिवशी ३९ हजार प्रवेश निश्चित

मुंबई : अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मुंबई विभागातून ३९ हजार ९९५ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत १ लाख १७ हजार ८८३ जागांवर विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. विद्यार्थ्यांना ३० ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेशाची मुदत देण्यात आली आहे. यादरम्यान पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असणार आहे. प्रवेशासाठी एक ‘प्रोसेस ऑफ ईलेव्हन ॲडमिशन इन महाराष्ट्र’ नावाचे ॲप सुरू केले आहे. गुगल प्ले-स्टोअर तसेच आयओएसवर हे ॲप उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना यावरून दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करता येणार आहे.

.....................................

Web Title: Commencement of Pediatric Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.