निर्यात क्षेत्राच्या विकासासाठी आजपासून वाणिज्य उत्सव परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:06 AM2021-09-21T04:06:33+5:302021-09-21T04:06:33+5:30
मुंबई : निर्यात क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय वाणिज्य उत्सव परिषद होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन उद्या सकाळी साडेदहा ...
मुंबई : निर्यात क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय वाणिज्य उत्सव परिषद होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन उद्या सकाळी साडेदहा वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे.
मुंबई येथील जागतिक व्यापार केंद्र येथे दोन दिवस ही परिषद चालणार असून, या वेळी उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे उपस्थित राहणार आहेत. ‘आजादी का अमृत महोत्सव : ७५ व्या स्वातंत्र दिनाच्या वर्धापन दिना’निमित्त केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागामार्फत २० ते २६ सप्टेंबर या कालावधीत ‘वाणिज्य सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत ही परिषद होणार आहे. विविध क्षेत्रांतील सुमारे २०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. उद्योजक, निर्यात प्रचालन परिषदांचे पदाधिकारी, निर्यातदार, शासन विभागाचे अधिकारी आदींचा समावेश असणार आहे.