मुंबई - समुद्र मार्गासाठी टाकण्यात येणाऱ्या प्रत्येक दोन खांबांमधील अंतर दोनशे मीटर असावे, या मागणीसाठी वरळी येथील मच्छीमारांनी शुक्रवारी आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतली. अखेर मच्छीमारांचे गाºहाणे मान्य करीत त्यांच्या समस्यांच्या निवारणासाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे.महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाला कोळी बांधवांचा विरोध आहे. या प्रकल्पामुळे माशांच्या प्रजननावर परिणाम होऊन मच्छीमारांच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वरळी येथील काम मच्छीमारांनी बंद पाडले आहे. समुद्र मार्गाच्या दोन खांबांमधील अंतर किमान दोनशे मीटर ठेवण्याची मागणी मच्छीमार संघटनांनी पालिका आयुक्तांकडे शुक्रवारी केली. त्यांच्या मागणीवर विचार करण्याची तयारी दर्शवित विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत प्रश्नांचा अभ्यास करून उचित तोडगा काढण्यात येणार आहे.महापालिकेच्या आराखड्यानुसार दोन खांबांमध्ये ६० मीटर अंतर ठेवण्यात येणार आहे. मात्र हे अंतर १२० मीटरहून अधिक असावे, अशी मच्छीमार संघटनांची मागणी आहे. या प्रकल्पासाठी समुद्रात भराव टाकण्यात येणार आहे. मात्र यामुळे पालघर येथील सातपाटी गावाप्रमाणे वरळी कोळीवाड्यातही पावसाळ्यात समुद्राचे पाणी शिरण्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली.नरिमन पॉइंट ते कांदिवली - २९.२ कि.मी. मार्गपहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी लिंकपर्यंत या ९.९८ कि.मी.चे काम २0१९ पर्यंत करण्यात येणार आहे.त्यानंतर वांद्रे सी लिंक ते कांदिवली या दुसºया टप्प्याचे काम करण्यात येणार आहे.किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचं बांधकाम करून कोस्टल रोडची बांधणी केली जाणार आहे.या कोस्टल रोडसाठी १२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
आयुक्तांनी ऐकले मच्छीमारांचे गा-हाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 3:54 AM