आयोगाच्या निकषानुसार पोलीस आयुक्त, आयजी करणार निवडणुकीच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 07:08 AM2019-02-05T07:08:25+5:302019-02-05T07:08:40+5:30

निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत कार्यवाही करताना पोलीस महासंचालक कार्यालयात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गेल्या ११ दिवसांत त्याबाबत तब्बल तीन स्वतंत्र परिपत्रके बजाविली असून सूचनांमध्ये बदल केले आहेत.

Commissioner of Police, IG will transfer the election according to the Commission's criteria | आयोगाच्या निकषानुसार पोलीस आयुक्त, आयजी करणार निवडणुकीच्या बदल्या

आयोगाच्या निकषानुसार पोलीस आयुक्त, आयजी करणार निवडणुकीच्या बदल्या

Next

- जमीर काझी

मुंबई - निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत कार्यवाही करताना पोलीस महासंचालक कार्यालयात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गेल्या ११ दिवसांत त्याबाबत तब्बल तीन स्वतंत्र परिपत्रके बजाविली असून सूचनांमध्ये बदल केले आहेत. नव्या आदेशानुसार बदल्यांचे अधिकार आता पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांना देण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तालयातील उपायुक्तापासून उपनिरीक्षकापर्यंतच्या बदल्या संबंधित आयुक्तांकडून तर परिक्षेत्रातील बदल्या विशेष महानिरीक्षकाकडून केल्या जातील. तर, परिक्षेत्र व आयुक्तालयातील कार्यकाळ पूर्ण झालेल्यांच्या बदल्या महासंचालक कार्यालयाकडून केल्या जातील, यासंबंधीची कार्यवाही येत्या १० फेबु्रवारीपर्यंत पूर्ण करावी, असे आदेश पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिले आहेत.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पोलीस घटकातून बदलीपात्र अधिकाºयांची माहिती मागविण्यासाठी २२ जानेवारीला राज्यातील सर्व पोलीस घटकांना पत्र जारी करण्यात आले. त्यानंतर दुसºया दिवशी पुन्हा त्यात बदल करून शुद्धीपत्र लागू करण्यात आले. त्यानंतर पुन्हा शनिवारी आणखी एक पत्रक जारी केले. त्यामध्ये आयोगाच्या निकषामध्ये बसत असलेल्या अधिकाºयांच्या बदल्या करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त व विशेष महानिरीक्षकांना दिल्या आहेत.

डेस्क अधिकाºयांशी ‘सेटिंग’ला खो!

निवडणूक नियमानुसार बदली होणाºया अधिकाºयांच्या गेल्या महिन्याभरापासून पोलीस मुख्यालयात येरझाºया सुरू आहेत. ते संबंधित ‘डेस्क’च्या अधिकारी, क्लार्कशी संपर्क साधून सोयीच्या ठिकाणी बदली होण्यासाठी ‘अर्थ’पूर्ण चर्चा करीत आहेत. मात्र महासंचालकांनी आता आयुक्त आणि आयजी स्तरावर बदलीचे अधिकार दिल्याने त्यांची ‘सेटिंग’ बंद होणार आहे.

कायदा, सुव्यवस्था कायम राखण्यासाठीच सुधारणा
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी परिपत्रकामध्ये आवश्यक सुधारणा केल्या जात आहेत. आयुक्तालय व परिक्षेत्रातील कार्यकाळ पूर्ण होणाºया अधिकाºयांच्याच बदल्या पोलीस आस्थापना मंडळ-२ कडून केल्या जातील.
- कुलवंत सारंगल, अप्पर महासंचालक, आस्थापना विभाग

Web Title: Commissioner of Police, IG will transfer the election according to the Commission's criteria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.