आयोगाच्या खर्चदारात स्वस्ताई?
By admin | Published: September 20, 2014 11:21 PM2014-09-20T23:21:13+5:302014-09-20T23:21:13+5:30
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांनी केलेल्या विविध बाबींच्या खर्चाचे जे दर घोषीत केले आहेत,
Next
ठाणो : केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांनी केलेल्या विविध बाबींच्या खर्चाचे जे दर घोषीत केले आहेत, ते पाहता आयोग अजून स्वस्ताईच्या जमान्यात वावरत आहे की काय? असा प्रश्न उमेदवारांना हैराण करतो आहे. एकीकडे काही उमेदवारांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे तर अनेकांनी त्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. आयोगाच्या दरापेक्षा अनेक सेवांचे आणि वस्तूंचे दर हे निश्चितच महाग आहेत.
आयोगाच्या दर पत्रकानुसार दुचाकीसाठी 12क् रु. प्रतीदिन आकारले जाणार आहेत तर प्रत्यक्षामध्ये हा दर दुचाकी पेट्रोलसह असेल तर तीचा दर 5क्क् रु. रोज असा आहे. आणि जर तिच्यात इंधन वापरणारा भरणार असेल तर हा दर 3क्क् रुपयावर असतो. या शिवाय दुचाकी दर फोरस्ट्रोक असेल तर तिचा दर बदलतो, इंधनाचा वापर बदलतो. या कशाचीही आयोगाच्या आकडेवारीत दखल घेतलेली नाही. रिक्षासाठी 7क्क् रु. दर सांगितला आहे. प्रत्यक्षामध्ये हा दर इंधनासह 12क्क् ते 15क्क् रु. आणि नुसते भाडे 1 हजार रुपये असा आहे.
इंधन व ड्रायव्हर विना रिक्षा 8क्क् रुपयाला आहे. परंतु आयोगाने मात्र 7क्क् रुपयेच दर ठेवला आहे. आज कोणतेही कार दिवसभराच्या भाडय़ासाठी साडेतीन हजार रुपये आकारते. यामध्ये ड्रायव्हर आणि मर्यादित इंधन याचा समावेश असतो. टोल आणि इलेक्शन परमीट याचा खर्च वेगळा ए.सी. वापरल्यास खर्च वेगळा अशी वस्तू स्थिती असताना आयोगाने मात्र चारचाकी वाहन 24क्क् ते 43क्क् रु. असा धरला आहे. कापडी फलकाला लागणारा कपडा हा किमान 6क् रु. मीटर असताना व तो रंगवणो त्याला बांधायसाठी लागणारे दोन लाकडी राऊंड, फलकाची शिलाई, बांधायसाठी लागणारा दोर याची किंमत 3क्क् रु. र्पयत जाते पण आयोग मात्र कापडी बॅनर 6क् रु. एवढेच मानतो आहे.
आज साधी टोपी 3क्-4क् रुपयाला आहे. आयोगाने तिचे फक्त 1क् रु. धरले आहे. रंगीत फलक 1क्क्क् ते 32क्क् आकारानुसार गृहीत धरला आहे. परंतु प्रत्यक्षात मोठे रंगीत फलक हे त्यापेक्षा पाच पट अधिक रक्कम मोजल्यावर मिळतात. त्याचे डिझाईन, प्रिंटींग व होर्डीगवर चढविणो, त्यावर हॅलोजन लावणो या सगळ्याचे खर्च वेगळे असतात. स्वागत कमानीसाठी दीड हजार गृहित धरले आहेत. प्रत्यक्षात चांगली कमान उभारण्यासाठी त्यापेक्षा अधिक खर्च येतो. प्लॅस्टिक खूर्ची 5 ते 1क् रु.ला मिळते. आयोग तिचा दर 3 रु. मानतो आहे. टेबल 2क् ते 25 रु. भाडय़ाने मिळतो.
आयोग त्याचा दर 5 रु. मानतो आहे. कटींग चहा 7 रु. ला असताना व फुल्ल चहा 15 रु. असताना आयोग मात्र चहा 5 रु. ला गृहित धरतो आहे. कॉफी 15 ते 2क् रु. ला मिळते आयोग 1क् रु. ला गृहित धरते. मिनीरल वॉटर 2क् रु. ला मिळते तर आयोग 15 रु. गृहित धरत आहे. शाहाकारी जेवण उत्तम दर्जाचे 15क् ते 25क् रु आहे. आयोगाने 12क् रु. गृहित धरले आहे. मांसाहारी जेवण 2क्क् ते 35क् रु. मिळत असताना आयोगाने मात्र 15क् रु. लावले आहेत. ज्यांना ज्या उमेदवारांना वाढीव खर्च घटवून दाखवायची वेळ येते. त्यासाठी हे दर आनंदाचे आहेत. व ज्यांच्याकडे पैसाच कमी आहे व खर्च जास्त पण बील मात्र कमी रकमेचे अशी स्थिती आहे असे उमेदवार नाराज होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
आयोगाकडून कटींग चहा 7 रु. ला असताना व फुल्ल चहा 15 रु. असताना आयोग मात्र चहा 5 रु. ला गृहित धरतो आहे. कॉफी 15 ते 2क् रु. ला मिळते आयोग 1क् रु. ला गृहित धरते. मिनीरल वॉटर 2क् रु. ला मिळते तर आयोग 15 रु. गृहित धरत आहे. शाहाकारी जेवण उत्तम दर्जाचे 15क् ते 25क् रु आहे. आयोगाने 12क् रु. गृहित धरले आहे.