मुंबई - मागच्या सत्ताधारी लोकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर राजकीय फायदा करुन घेण्यासाठी केल्याच्या तक्रारी आल्यावर चौकशीसाठी दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. या चौकशीचा अहवाल ६ आठवडयात दिला जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली.समितीमध्ये गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंग, एसआयडीचे सहआयुक्त अमितेशकुमार या दोघा वरीष्ठ अधिकार्यांचा समावेश आहे. इस्रायल जे लोक गेले होत, त्या सर्व गोष्टींची चौकशी करुन ६ आठवड्यात अहवाल देण्यात येणार आहे. नागपाडा येथे शाहीनबागच्या धर्तीवर जे आंदोलन सुरु आहे ते बेकायदा आहे. त्याची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. आज संबंधित आंदोलनकर्त्यांशी चर्चा झाली असून त्यातील लोकांनी भेट घेतली असून ते लवकरच आंदोलन मागे घेतील असेही देशमुख यांनी सांगितले.
फोन टॅपिंगप्रकरणी २ वरिष्ठ अधिकार्यांची समिती; ६ आठवड्यात अहवाल देणार - गृहमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 8:27 PM
हिंगणघाट अॅसिड हल्ला फास्ट ट्रॅक कोर्टात
ठळक मुद्देया चौकशीचा अहवाल ६ आठवडयात दिला जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली.समितीमध्ये गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंग, एसआयडीचे सहआयुक्त अमितेशकुमार या दोघा वरीष्ठ अधिकार्यांचा समावेश आहे.