२० सदस्यांची समिती करणार आरटीई प्रवेशासाठी तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:51 AM2019-03-13T01:51:35+5:302019-03-13T01:52:14+5:30

समिती करणार सोडतीतून प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी ​​​​​​​

The committee of 20 members will be examined for admission to the RTE | २० सदस्यांची समिती करणार आरटीई प्रवेशासाठी तपासणी

२० सदस्यांची समिती करणार आरटीई प्रवेशासाठी तपासणी

Next

- दिगांबर जवादे 

गडचिरोली : बोगस कागदपत्रे जोडून बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी यावर्षी प्रत्येक तालुकास्तरावर २० सदस्यांची समिती गठीत केली जाणार आहे. ही समिती सोडतीतून प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणार आहे.

आरटीईअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आजपर्यंत अनेक बदल केले आहेत. सुरूवातीला सोडत काढण्याची प्रक्रिया जिल्हास्तरावर घेतली जात होती. आता पुणे येथून सोडत काढली जाते. सोडतमध्ये विद्यार्थ्याचा प्रवेशासाठी नाव निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर सोपविली होती.

पोर्टलवर प्रवेश अर्ज भरताना कोणतीही कागदपत्रे मागितली जात नाही. केवळ विद्यार्थ्याविषयी माहिती भरायची असते. त्यामुळे आपल्या पाल्याला इच्छित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी बऱ्याच वेळा पालक चुकीची माहिती भरत होते. माहितीशी संबंधित कागदपत्रे नसल्याने सदर विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याचे अधिकार मुख्याध्यापकांकडे होते. यात मुख्याध्यापकांवर दबावतंत्राचा वापर करून प्रवेश मिळविला
जात होता. हा प्रकार प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या लक्षात आल्यानंतर २० सदस्यांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: The committee of 20 members will be examined for admission to the RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.