मुंबई : सीएए आणि एनआरसीवर राज्यातील महाविकास आघाडीची भूमिका ठरविण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला.परिवहन व संसदीय कामकाज मंत्री अनिल परब (शिवसेना) हे या समितीचे अध्यक्ष असतील. समितीमध्ये बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार(काँग्रेस), अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत (शिवसेना) हे समितीचे सदस्य असतील. समिती सीएए आणि एनआरसीचा अभ्यास करून राज्य शासनाला अहवाल देईल. त्यावर राज्य मंत्रिमंडळ योग्य तो निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले. अशी समिती स्थापन करण्याची घोषणा विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केली होती.
सीएए, एनआरसीवर सहा मंत्र्यांची समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 3:41 AM