मुंबई : मनोरा आमदार निवासात खोल्यांच्या दुरुस्तीत घोटाळा झाल्याचे अहवाल दोन अधीक्षक अभियंत्यांनी दिल्यानंतरही आता संयुक्त मोजणी पथक तयार करण्यात आले आहे. त्याची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यावर दिली आहे.महिनाभरापूर्वी कार्यकारी अभियंता सुषमा गायकवाड यांना मोजणी पथकाचे प्रमुख म्हणून नेमले. चार दिवसांपूर्वी एक आदेश काढून त्यांच्याऐवजी ही जबाबदारी कार्यकारी अभियंता डी.यू.महाजन यांच्यावर सोपवली. याआधी धनंजय चामलवार आणि सूर्यवंशी या दोन अधीक्षक अभियंत्यांनी अहवाल देत मनोरातील घोटाळ्यांवर शिक्कामोर्तब केले होते. त्यावरून एक कार्यकारी अभियंता, एक उपअभियंता आणि एका कनिष्ठ अभियंत्यास निलंबित केले आहे. घोटाळ्यांबाबतच्या तक्रारींबाबत स्वयंस्पष्ट फेरअहवाल सादर करण्यास सांगितले असून त्यासाठी महाजन यांचे पथक उद्या मनोरा आमदार निवासात जाऊन मोजणी करणार आहे. त्यावेळी निलंबित अधिकाऱ्यांनाही हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अधीक्षक अभियंत्यांच्या अहवालावर समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 4:50 AM