Join us

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंबंधी कुलगुरूंची समिती गठित, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 7:01 AM

विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, याची विशेष काळजी घेऊन सहज आणि सुलभ पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी ही समिती गठित करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.

मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात शनिवारी १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. बैठकीत ६ कुलगुरूंची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती ३० आॅगस्ट रोजी दुपारी ११ वाजेपर्यंत बैठक घेऊन त्यानंतर अहवाल सादर करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, याची विशेष काळजी घेऊन सहज आणि सुलभ पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी ही समिती गठित करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. विद्यार्थीहित लक्षात घेऊन एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन विद्यापीठांनी एका समान पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील याचे नियोजन करावे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणे शक्य आहे का, याबद्दलही विचार करावा, अशा सूचना शनिवारी झालेल्या या आॅनलाइन बैठकीत उदय सामंत यांनी दिल्या.विद्यापीठ आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार या परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत पार पाडाव्या लागणार आहेत. ही मुदत पाळणे शक्य होणार नसेल तर ती मुदत वाढवून घेण्यासाठी सरकार यूजीसीकडे विनंतीअर्ज करू शकेल, अशी मुभा कोर्टाने दिली.राज्यपालांशीही चर्चा करणारबैठकीत गोवा, दिल्ली, मध्य प्रदेश, बनारस विद्यापीठ यांनी कशा पद्धतीने तेथील परीक्षा घेतल्या आहेत, याचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. समितीने अहवाल सादर केल्यानंतर त्याच्यावर निर्णय घेऊन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि मगच निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :परीक्षाउदय सामंतमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस