आरक्षणाला समितीचाच विरोध

By admin | Published: March 28, 2015 02:07 AM2015-03-28T02:07:06+5:302015-03-28T02:07:06+5:30

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याच्या मुद्द्यावरून शुक्रवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

Committee's opposition to reservation | आरक्षणाला समितीचाच विरोध

आरक्षणाला समितीचाच विरोध

Next

मुद्दा धनगर आरक्षणाचा : खडसे यांचा गौप्यस्फोट; विरोधकांचा सभात्याग
मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याच्या मुद्द्यावरून शुक्रवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. धनगर समाजाला आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप विरोधकांनी करताच आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणे घटनाबाह्य ठरेल अशी शिफारस केली होती, असा गौप्यस्फोट महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली.
राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण कसे देता येईल, ही बाब तपासून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिले. मात्र त्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. आरक्षण नेमके कधी देणार
ते सांगा, अशी मागणी करीत विरोधकांनी आदिवासी मंत्र्यांची कोंडी करण्याचा
प्रयत्न केला.
अखेर सभागृह नेते खडसे यांनी चर्चेत हस्तक्षेप करीत सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. त्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला जाईल,
असे खडसे यांनी स्पष्ट केले. कायदेशीर बाबींची पूर्तता न करता आरक्षण
द्यायचे आणि न्यायालयाने निर्णय फेटाळल्यावर अंग चोरायचे असला प्रकार आम्ही करणार नाही, असा टोलाही खडसे यांनी लगावला. (प्रतिनिधी)

आदिवासी मंत्र्यांचा आवाज दाबू नका
च्खडसेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर विरोधकांनी आपला मोर्चा पुन्हा सावरा यांच्याकडे वळविला. आदिवासी मंत्री सभागृहात असल्याने त्यांनीच उत्तर द्यावे. आदिवासी मंत्र्यांना बोलू द्या़ त्यांचा आवाज दाबू नका, असा आग्रह विरोधकांनी धरला.
च्सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही मुख्य उत्तर आदिवासी मंत्र्यांनी द्यावे आणि त्यानंतर काही मुद्दे सांगायचे असतील तर महसूल मंत्र्यांनी नंतर सांगावेत, असा निर्देश दिला.
च्त्यानंतर सावरा यांनी खडसे यांचेच उत्तर पुढे रेटत आपले निवेदन पूर्ण केले. यावर चिडलेल्या विरोधकांनी सरकारविरोधी घोषणा देत सभात्याग केला.

Web Title: Committee's opposition to reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.