मुंबईच्या वीज पुरवठ्यावर समितीचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:05 AM2021-05-30T04:05:55+5:302021-05-30T04:05:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला करण्यात येणाऱ्या वीज पुरवठयासोबतच मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या सर्व वीज ...

Committee's 'watch' on Mumbai's power supply | मुंबईच्या वीज पुरवठ्यावर समितीचा ‘वॉच’

मुंबईच्या वीज पुरवठ्यावर समितीचा ‘वॉच’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला करण्यात येणाऱ्या वीज पुरवठयासोबतच मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या सर्व वीज कंपन्यांच्या प्रकल्पांवर तज्ज्ञांच्या समितीचे बारीक लक्ष असणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून ही समिती नेमण्यात आली आहे.

मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या चार ४०० के. व्ही. वीजवाहिन्या आहेत. या चारही वाहिन्या ४०० के. व्ही. कळवा उपकेंद्र येथे येतात. तेथून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला वीज वितरीत केली जाते. तसेच टाटा आणि अदानी यांचे एकत्रित १,८०० मेगावॅट वीजनिर्मितीद्वारे वीज पुरवठा केला जातो. त्या चार वाहिन्यांपैकी ४०० के. व्ही. कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी गेल्यावर्षी १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजून ४७ मिनिटानी या वाहिनीचा कंडक्टर तुटल्यामुळे बंद झाली होती. तसेच झालेला बिघाड हा सह्याद्री रांगांच्या माथ्यावरील दुर्गम भागात असल्याने तेथे काम करणे अत्यंत खडतर असे असले तरीही तेथे काम युद्धपातळीवर सुरु होते. ४०० के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी -१ ही १२ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजून ३३ मिनिटानी ओव्हर व्होल्टेजमुळे बंद पडली. तसेच या वाहिनीचे बाधित इन्सुलेटर बदलण्याचे काम सुरु होते. तरीही मुंबईतील वीजनिर्मितीद्वारे व उर्वरित दोन वाहिन्यांच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत सुरू होता. परंतु, सकाळी १० वाजून १ मिनिटांनी ४०० के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-२ तांत्रिक बिघाड झाल्याने बंद झाली आणि मुंबईची वीजव्यवस्था आयलॅंडिंगवर गेली. त्याचवेळेस टाटा पॉवरचे ५०० मेगावॅट आणि अदानीचे २५० मेगावॅटचे डहाणू येथील वीजनिर्मिती संच बंद झाल्यामुळे मुंबईतील वीज पुरवठा बाधित झाला होता.

तांत्रिक अडथळे दूर करण्याचे प्रयत्न

विशेषत: गेल्यावर्षीच झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्याचा मोठा फटका वीज ग्राहकांना बसला होता. त्यामुळे सर्वच वीज यंत्रणेवर मोठी टीका झाली होती. वीज नियामक आयोगासह वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी या विषयावर खडे बोल सुनावले होते. त्यानंतर उपाययोजना करण्यात येत असून, वीज पुरवठ्यातील तांत्रिक आणि इतर अडथळे दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Web Title: Committee's 'watch' on Mumbai's power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.