कौशल्य विकासासाठी ‘कम्युनिटी प्रकल्प’

By admin | Published: June 23, 2016 04:00 AM2016-06-23T04:00:19+5:302016-06-23T04:00:19+5:30

हल्ली कोणत्याही नोकरीसाठी संगणकाचे ज्ञान अत्यावश्यक झाले आहे. पण तळागाळातील लोकांपर्यंत अजूनही संगणक हवा तसा पोहोचलेला नाही.

'Community Project' for skill development | कौशल्य विकासासाठी ‘कम्युनिटी प्रकल्प’

कौशल्य विकासासाठी ‘कम्युनिटी प्रकल्प’

Next

मुंबई : हल्ली कोणत्याही नोकरीसाठी संगणकाचे ज्ञान अत्यावश्यक झाले आहे. पण तळागाळातील लोकांपर्यंत अजूनही संगणक हवा तसा पोहोचलेला नाही. समाजातील वंचित घटकांना सक्षम करण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे कम्युनिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या माध्यमातून संगणकाचे ज्ञान तळागाळापर्यंत पोहोचवण्यास मदत होत आहे.
कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे ‘कम्युनिटी प्रोजेक्ट : स्किल इंडिया’(उढरक) प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून १५ ते ५६ वयोगटातील फळविक्रेते, वर्तमानपत्र विक्रेते, सुरक्षारक्षक, वंचित मुले-मुली यांना संगणक कसा हाताळावा, याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
एमएस आॅफीस, पॉवर पॉइंट आणि इंटरनेटविषयीचे ज्ञान देण्यात येत असून, पहिल्या यशस्वी प्रयत्नानंतर दुसऱ्या बॅचसाठी तब्बल ५० जणांनी नावे नोंदवली आहेत. लवकरच या वर्गाला विद्यापीठात सुरुवात होणार आहे. या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील भौतिकशास्त्र विभागाशी संपर्क साधावा.
विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या आण्विक भौतिकशास्त्रज्ज्ञ डॉ. ममता अग्रवाल यांच्या मदतीने हा प्रकल्प सुरू झाला असून, कोणत्याही वयोगटातील विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात सहभागी होऊ शकतात. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या होतकरूंना याविषयी माहिती देऊन ज्ञान वृद्धिंगत करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Community Project' for skill development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.