मुंबई विमानतळावर प्रवासी विसरले १० कोटींच्या वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 07:04 AM2019-11-28T07:04:22+5:302019-11-28T07:04:47+5:30

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत प्रवासी तब्बल १० कोटी ८ लाख १७ हजार ७८ रुपये किमतीच्या वस्तू विमानतळावर विसरले.

Commuters forget about 3 crore items at Mumbai airport | मुंबई विमानतळावर प्रवासी विसरले १० कोटींच्या वस्तू

मुंबई विमानतळावर प्रवासी विसरले १० कोटींच्या वस्तू

Next

- खलील गिरकर
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत प्रवासी तब्बल १० कोटी ८ लाख १७ हजार ७८ रुपये किमतीच्या वस्तू विमानतळावर विसरले.

जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत मुंबई विमानतळावर १० कोटी ८ लाख १७ हजार ७८ रुपये किमतीच्या वस्तू प्रवासी विसरले. त्यापैकी ७ कोटी १२ लाख २ हजार ९६८ रुपये किमतीच्या वस्तू एअरपोर्ट आॅपरेटरकडे सोपविण्यात आल्या, तर २ कोटी ९६ लाख १४ हजार ११० रुपये किमतीच्या वस्तू संबंधित प्रवाशांना थेट परत देण्यात आल्याची माहिती सीआयएसएफतर्फे देण्यात आली.

९ महिन्यांत मिळालेल्या वस्तूंमध्ये लॅपटॉप, दागिने, मोबाइल व पर्स यांचा सर्वात जास्त समावेश आहे. अशा प्रकारे एकूण ३५ हजार ८१३ वस्तू प्रवासी विसरले होते. प्रवाशांना लॅपटॉप, पर्स, मोबाइलचा सर्वाधिक विसर पडत असल्याचे सापडलेल्या वस्तूंमुळे निदर्शनास आले आहे.

मुंबई विमानतळाला नेहमी धोका असल्याने, या विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो व प्रवाशांची कसून तपासणी केली जाते. विमानतळाच्या विविध भागांत प्रवासी वस्तू विसरतात. मात्र, त्याचा फटका सीआयएसएफला बसतो. बेवारस असलेल्या कोणत्याही वस्तूकडे संशयित, धोकादायक वस्तू म्हणून पाहिले जात असल्याने सुरक्षायंत्रणांना अधिक काम करावे लागते.


७ कोटी १२ लाख २ हजार ९६८ रुपये किमतीच्या वस्तूंचे मालक अद्याप समोर आलेले नसल्याने या वस्तू एअरपोर्ट आॅपरेटरकडे सोपविण्यात आल्या असून, विमानतळावरील हरवले-सापडले विभागात त्या ठेवल्या आहेत. सीआयएसएफच्या वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात येते. त्यानंतर, जे प्रवासी वस्तू विसरले असतील, त्यांनी योग्य पुरावा दिल्यास ती वस्तू परत केली जाते, अशी माहिती सीआयएसएफचे मुंबई विमानतळाचे उपमहानिरीक्षक के.एन. त्रिपाठी यांनी दिली.

५,४०५ प्रवाशांना वस्तू केल्या परत
९ महिन्यांत विविध प्रवासी ३५ हजार ८१३ वस्तू विसरले. मात्र, सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या साहाय्याने सीआयएसएफने त्यापैकी ५,४०५ प्रवाशांना त्यांच्या विसरलेल्या वस्तू केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) परत करण्यात आल्या आहेत.

Web Title: Commuters forget about 3 crore items at Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.