गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; २०३१ बस फुल्ल

By सचिन लुंगसे | Published: August 5, 2024 02:31 PM2024-08-05T14:31:46+5:302024-08-05T14:31:54+5:30

एसटीच्या १३०१ बस गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बस आतापर्यंत फुल झाल्या आहेत.

Commuters overwhelming response to ST to go to Konkan for Ganapati | गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; २०३१ बस फुल्ल

गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; २०३१ बस फुल्ल

मुंबई : गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या  चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या १३०१ बस गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बस आतापर्यंत फुल झाल्या आहेत.

गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ ते ०७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बस सोडण्यात येणार आहेत.

दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा एसटीतर्फे सुमारे ४३०० जादा गाड्या सोडण्यात येणार असून त्यापैकी २०३१ बस फुल झाल्या आहेत. एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत.

Web Title: Commuters overwhelming response to ST to go to Konkan for Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.