‘निसर्ग’मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मच्छीमारांना द्या - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 03:35 AM2020-06-21T03:35:00+5:302020-06-21T03:35:13+5:30

झालेल्या हानीची नुकसानभरपाई करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले.

Compensate fishermen for damage caused by 'nature' - High Court | ‘निसर्ग’मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मच्छीमारांना द्या - हायकोर्ट

‘निसर्ग’मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मच्छीमारांना द्या - हायकोर्ट

Next

मुंबई : निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या निवेदनाची दखल घेऊन राज्य सरकार व आपत्कालीन व्यवस्थापन प्रशासनाने मच्छीमारांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून मूल्यांकन करावे. त्यानुसार झालेल्या हानीची नुकसानभरपाई करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले.
ही याचिका दामोदर तांडेल यांनी दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. के. के. तातेड यांच्या खंडपीठापुढे होती.
याचिकेनुसार, राज्य सरकारने मच्छीमारांना अद्याप फयान चक्रीवादळामुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे निसर्ग वादळामुळे झालेली आर्थिक हानी सरकारने भरून द्यावी. ही नुकसान भरपाई देण्यात आली नाही तर त्यांचे मच्छीमारीचे काम सुरू होऊ शकत नाही, असे या याचिकेत म्हटले आहे.

Web Title: Compensate fishermen for damage caused by 'nature' - High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.