बारावीच्या बोर्डाकडून चुकांची भरपाई, विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ६ गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 06:27 AM2023-03-05T06:27:46+5:302023-03-05T06:28:11+5:30

कुणावरही अन्याय होणार नाही, शिक्षण मंडळाची ग्वाही

Compensation of mistakes from 12th board hsc maharashtra education board 6 marks of English to students | बारावीच्या बोर्डाकडून चुकांची भरपाई, विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ६ गुण

बारावीच्या बोर्डाकडून चुकांची भरपाई, विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ६ गुण

googlenewsNext

मुंबई : बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरमध्ये राज्य शिक्षण मंडळाकडून झालेल्या चुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विषयतज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाने प्रमुख नियामकांच्या उपस्थितीत इंग्रजी विषयाची संयुक्त सभा घेतली. या सभेतील अहवालानुसार राज्य मंडळाने निर्णय घेतला असून, विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास सहा गुण मिळणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर मंडळाकडून झालेल्या चुकीमुळे अन्याय होणार नाही, असे मंडळाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे.

बारावीच्या इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते.  त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत A-3, A-4, A-5 या तीन कृतींमध्ये दोन प्रश्न छापण्यात आलेले नाहीत, तर एका प्रश्नाऐवजी उत्तरच छापण्यात आले आहे.  त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले, तर काही विद्यार्थ्यांनी गोंधळून प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत. विद्यार्थ्यांनी प्रश्नच न समजल्याने उत्तरे लिहिण्याचे टाळले आणि त्यांचे गुण आता जाणार, अशी भीती त्यांना वाटू लागली. 

मंडळाने या प्रश्नाचे सरसकट गुण विद्यार्थ्यांना द्यावेत, अशी मागणी पालक, शिक्षकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर संयुक्त सभा घेऊन त्याच्या अहवालानुसार निर्णय घेतला जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले होते. त्यामुळे अहवालानंतर आता मंडळाकडून गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुण कोणाला मिळणार? 
खालील तीनपैकी कोणत्याही एका प्रकारचे लेखन उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांने केले असल्यास, विद्यार्थ्यास प्रत्येक प्रश्नाचे प्रत्येकी २ याप्रमाणे ६ गुण देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
 

  • कविता विभाग/ कविता प्रश्न क्रमांक असा उत्तरपत्रिकेमध्ये उल्लेख केला असल्यास
  • Poetry Section-2 मधील अन्य कोणतेही प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास
  • संबंधित प्रश्नाचे क्रमांक (A-3, A-4, A-5) असे केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केले असल्यास.
     

सरसकट सगळ्यांना गुण द्या
इंग्रजीच्या पेपरमध्ये झालेली चूक विद्यार्थ्यांची नसून मंडळाची आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आणि अनेकांनी तो प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे, केवळ त्यांना गुण न देता सगळ्यांना सरसकट गुण द्यावेत, अशी मागणी शिक्षक आणि पालकांनी केली आहे.

Web Title: Compensation of mistakes from 12th board hsc maharashtra education board 6 marks of English to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.