Join us

सिंगापूर एअरलाइन्सकडून ‘त्या’ प्रवाशाला भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 6:26 AM

सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाने बिजिंग ते मुंबई व्हाया सिंगापूर असा प्रवास करताना विमानात विसरलेल्या बॅगेमधील तब्बल १५ हजारांच्या वस्तू गहाळ झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर व लोकमतने बातमी प्रकाशित केल्यानंतर सिंगापूर एअरलाइन्सने देवांशी ठक्कर या महिला प्रवाशाला १५ हजारांचा धनादेश व नवीन बॅग घेऊन दिली आहे.

मुंबई - सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाने बिजिंग ते मुंबई व्हाया सिंगापूर असा प्रवास करताना विमानात विसरलेल्या बॅगेमधील तब्बल १५ हजारांच्या वस्तू गहाळ झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर व लोकमतने बातमी प्रकाशित केल्यानंतर सिंगापूर एअरलाइन्सने देवांशी ठक्कर या महिला प्रवाशाला १५ हजारांचा धनादेश व नवीन बॅग घेऊन दिली आहे. लोकमतने याबाबत २३ जुलैला बातमी प्रकाशित केली होती. एअरलाइन्सने घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली.ठक्कर यांनी ‘लोकमत’चे आभार व्यक्त करून असे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठी एअरलाइन्सने काळजी घ्यावी, असे मत व्यक्त केले आहे. त्या २० जुलै रोजी सिंगापूर एअरलाइन्सच्या एसक्यू ४२२ या विमानाने प्रवास करत असताना त्यांनी आपले सामान बॅगेज काउंटरमध्ये ठेवण्यास दिले होते. मात्र, मुंबईत विमान आल्यानंतर त्यांची एक बॅग सिंगापूर विमानतळावर राहिली असून दुसऱ्या दिवशी ती बॅग मिळेल, अशी माहिती त्यांना कंपनीच्या कर्मचाºयांनी दिली. २१ जुलै रोजी त्यांना त्यांची बॅग परत करण्यात आली.अधिकाºयांच्या समोर बॅग उघडण्यात आली. मात्र, ती बॅग अनेक ठिकाणी फाटलेली होती व त्यामधील २३ हजार रुपयांच्या विविध वस्तू गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ठक्कर यांनी या घटनेबाबत सिंगापूर एअरलाइन्स कंपनीकडेतक्रार नोंदवली व या वाईट अनुभवाबाबत नाराजी व्यक्त केली.८ हजार रुपये किमतीची बॅगखराब झाली असून त्यामध्येअसलेले १२ हजार रुपयांचेघड्याळ व ३ हजार रुपयांची इमिटेशन ज्वेलरी गहाळ झाली अशा प्रकारे एकूण २३ हजार रुपयांना आपल्याला आर्थिक फटका पडल्याचा आरोप ठक्कर यांनी केला होता.

टॅग्स :विमानबातम्या