विद्यापीठात मॅनेजमेंट कौन्सिलसाठी स्पर्धा सुरू, २१ जुलै रोजी होणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:50 AM2018-07-07T04:50:12+5:302018-07-07T04:50:19+5:30

मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीनंतर आता मॅनेजमेंट कौन्सिलच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी आठ जागांसाठीच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका नुकतीच विद्यापीठाने जाहीर केली आहे.

The competition for the management council in the university will start on July 21 | विद्यापीठात मॅनेजमेंट कौन्सिलसाठी स्पर्धा सुरू, २१ जुलै रोजी होणार निवडणूक

विद्यापीठात मॅनेजमेंट कौन्सिलसाठी स्पर्धा सुरू, २१ जुलै रोजी होणार निवडणूक

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीनंतर आता मॅनेजमेंट कौन्सिलच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी आठ जागांसाठीच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका नुकतीच विद्यापीठाने जाहीर केली आहे. त्यात प्राचार्य, अध्यापक व विद्यापीठ अध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि नोंदणीकृत पदवीधर अशा चार प्रवगार्चा समावेश असून ही निवडणूक २१ जुलै रोजी होणार आहे.
सिनेट निवडणुकीवर एकतर्फी विजय मिळविल्याचा फायदा युवा सेनेच्या पदरी पडण्याची शक्यता असून मॅनेजमेंट कौन्सिलच्या दोन जागांवर युवा सेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. तर प्राचार्य आणि कॉलेज व्यवस्थापन प्रवगार्तील निवडणूक ही बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. या निवडणुकीसाठी या चारही प्रवगार्तून उमेदवारांना १० जुलैपर्यंत अर्ज करावयाचे असून १३ जुलै रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, या चारही प्रवर्गांपैकी अध्यापक व विद्यापीठ प्राध्यापक प्रवगार्साठी निवडणुक होण्याची शक्यता आहे. तसेच इतर तीनही प्रवगार्तील उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतात. यात पदवीधर प्रवगार्तून सिनेटवर दहाही जागांवर युवा सेनेला फायदा होण्याची शक्यता असल्याने युवा सेनेच्या प्रदीप सावंत आणि राजन कोंळबेकर यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
फक्त विद्यापीठ अध्यापक आणि प्राध्यापक प्रवगार्तील होणाऱ्या निवडणुकीसाठी तब्बल ६६ मतदारांची यादी विद्यापीठाने जाहीर केली आहे. त्यात राज्यपालांचे तसेच आणखी एक नाव कमी होणार असल्याने कळते. त्यामुळे ६४ जणांची अंतिम यादी होणार आहे. तर निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी प्राध्यापकांना त्यांच्या पारड्यात सुमारे ३४ मते पाडावी लागतील. इच्छुक उमेदवारांनी विद्यापीठातील अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या मदतीने प्रचार सुरू केला आहे.

Web Title: The competition for the management council in the university will start on July 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई