Join us

‘बीएफआय’च्या मान्यतेविना स्पर्धा

By admin | Published: May 09, 2017 1:46 AM

अनेक खेळांच्या लीग नंतर आता बॉक्सिंगच्या लीग स्पर्धेचीही रंगत रंगणार असून मंगळवारी मुंबईत सुपर बॉक्सिंग लीग (एसबीएल)

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनेक खेळांच्या लीग नंतर आता बॉक्सिंगच्या लीग स्पर्धेचीही रंगत रंगणार असून मंगळवारी मुंबईत सुपर बॉक्सिंग लीग (एसबीएल) स्पर्धेची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे भारतीय बॉक्सिंग संघटनेची (बीएफआय) मान्यता नसल्यानंतरही या लीगची घोषणा झाली आहे. या लीगचे पहिले सत्र ७ जुलै ते १२ आॅगस्टपर्यंत नवी दिल्ली येथे होणार असून यामध्ये एकूण आठ संघांचा समावेश आहे. ब्रिटिश उद्योजक बिल दोसंझ आणि स्टार बॉक्सर आमिर खान यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या लीगमध्ये मुंबई असेसिन्स, दिल्ली ग्लॅडीएटर्स, हरयाणा वॉरियर्स, शेर ए पंजाब, यूपी टर्मिनिएटर, नॉर्थ इस्ट टायगर्स, मराठा योध्दा आणि साऊदर्न सुपर किंग्ज या ८ संघांचा समावेश आहे. भारताच्या राष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेबाबत विचारले असता दोसंझ म्हणाले की, ‘ही एक व्यावसायिक स्पर्धा असून यासाठी कोणाच्याही मान्यतेची आवश्यकता नाही.’ एकूण ९६ खेळाडूंचा समावेश असलेल्या या लीगमधील प्रत्येक संघात १२ खेळाडू असतील. ७ जुलै ते ३० जुलै लीग सामने पार पडल्यानंतर ५ आणि ६ आॅगस्टला उपांत्य फेरी रंगेल. यानंतर १२ आॅगस्टला अंतिम सामना खेळविण्यात येईल. प्रत्येक संघात १२ बॉक्सर असून त्यातील सहा बॉक्सर हे बॅकअप म्हणून असतील. तसेच, प्रत्येक अंतिम संघात ५ पुरुष व एक महिला बॉक्सर असणे अनिवार्य आहे.