- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या विवाह दाखला पोर्टलला तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना विवाह दाखला मिळत नाही .दि,११ जून पासून महानगरपालिकेच्या विवाह नोंदणी कार्यालयातून मिळणारा विवाह दाखला नागरिकांना तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने मिळत नसल्याने विवाहितांची कामे रखडली जात आहे.
या नोंदणी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर वार्डातील विवाह नोंदणी कार्यालयाची तारीख मिळते. तारीख मिळाल्यानंतर कागदपत्रांची तपासणी झाल्यावर एक-दोन दिवसांनी नागरिकांनी ऑनलाइन पेमेंट केल्यावर त्यांच्या मेलवर पावती व विवाह दाखला परत प्राप्त होतो. परंतू गेला महिनाभर विवाह दाखल्याची प्रत मेलवर येते, परंतू त्याची पैसे भरण्याची पावती आल्याने विवाह दाखला कार्यालयातून स्टॅम्प मारून देण्यास अधिकारी नकार देत असल्याची माहिती साद प्रतिसाद संस्थेचे अध्यक्ष संदीप सावंत यांनीलोकमतला दिली.
मनपा पी पूर्व येथे विवाह दाखल्या करता अर्ज केला होता परंतू पावती न आल्याने त्यांना त्यांच्या ऑफिसला विवाह दाखला देऊन खोळंबलेली कामे करता येत नसल्याचे शीतल शिर्के यांनी सांगितले.
पी पूर्व विभागाचे वैद्यकीय अधिकारी नितेश ठाकूर यांना याबाबत अनेक तक्रारी येत मनपा आयटी विभागाला याबाबत कळविण्यात आले आहे, परंतू अजूनही याबाबत तोडगा निघालेला नाही.लवकरच तोडगा निघेल व नागरिकांना विवाह दाखला मिळेल असे उत्तर पालिकेचे संबंधित अधिकारी देत असल्याची माहिती विवाहितांनी दिली.