Join us

अभिषेक घोसाळकर यांच्या विरोधात तक्रार

By admin | Published: November 03, 2014 1:22 AM

तुळजाभवानी नागरी सेवा संस्थेचे अध्यक्ष दीपक आरे यांनी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्याविरोधात शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिली म्हणून एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

मुंबई : तुळजाभवानी नागरी सेवा संस्थेचे अध्यक्ष दीपक आरे यांनी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्याविरोधात शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिली म्हणून एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.शनिवारी शास्त्रीनगर नवागाव येथे पालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी स्थानिक नगरसेवक या नात्याने नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना आमंत्रित करण्यात आले होते.मात्र संस्थेचे अध्यक्ष दीपक आरे यांनी नवनिर्वाचित आमदार मनीषा चौधरी यांनाही आमंत्रित केले होते. मनीषा चौधरी यांना कामानिमित्त लवकर जायचे होते़ त्यामुळे कार्यक्रम लवकर सुरू करण्यातआला. १५ मिनिटांतच नगरसेवक अभिषेक घोसाळकर तेथे पोहोचले. आपण येण्याआधी अभियान कसे सुरू केले, अशी विचारणा करीत आरेंच्या अंगावर धावून गेल्याचे आरेंनी एमएचबी पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.या तक्रारीवरून पोलिसांनी घोसाळकरांविरोधात आरे यांना मनात राग धरून शिवीगाळ, धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदवली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मी पोहोचण्याआधी स्थानिक नागरिक व आरे यांच्या स्वच्छता मोहिमेवरून उद्रेक झाला होता. त्यादरम्यान मी पोहोचलो व मी येण्याआधी कार्यक्रम कसा सुरू केला याबाबत विचारणा केली असता त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आमच्याविरोधात घोषणाबाजी केली व माझ्याशी गैरवर्तन केले़ याची लेखी तक्रार आपण शनिवारीच एमएचबी पोलीस ठाण्यात दिल्याची माहिती नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)