ठाणे : ‘‘गर्व्हमेंट आॅफ इंडीया वॉटेंड टेररिस्ट टु किल टेररिस्ट संपर्क केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर’’ अशा आशयाचा फलक लावणाऱ्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात माजी महापौर व वकील सुभाष काळे यांनी तक्रार दाखल केली आहे. शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हरिनिवास सर्कल येथे हे फलक लावण्यात आले आहे. आमदार आव्हाडांनी हे फलक लावल्याचा आरोप काळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. तसेच फलकामुळे आव्हाडांनी भारत सरकारमध्ये अतिरेक्यांची भरती करावयाची आहे आणि त्यासाठी पर्रीकर यांच्याशी संपर्क साधवा, असे लिहीलेले आहे. त्यामुळे सरकारची बदनामी करून सरकार विरूद्ध नागरिकांना चिथावणी दिली जात आहे. अशाप्रकारे फलक लावणाऱ्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी ही तक्रार दाखल केली आहे. चौकशी करून कारवाई करण्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.अशाप्रकारचे वक्तव्य स्वत:मनोहर पर्रीकर यांनी केल्याने ते वर्तमानपत्रात प्रसिध्द झाले आहे. त्यांच्या या भूमिकेतून त्यांची मानसिकता दिसून येते.त्यांना या देशात अतिरेकीच निर्माण करायचे आहेत. - जितेंद्र आव्हाड, आमदार
आव्हाडांच्या विरोधात तक्रार
By admin | Published: May 23, 2015 10:52 PM