अतिक्रमणाविरुद्ध डावखरेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By admin | Published: April 5, 2015 01:32 AM2015-04-05T01:32:15+5:302015-04-05T01:32:15+5:30

शहरातील आराधना सिनेमा थिएटरजवळ एसटी बस आगारासाठी सुमारे ५ हजार चौरस मीटरचा भूखंड आरक्षित ठेवण्यात आलेला आहे.

Complaint against Chief Minister on the issue of encroachment | अतिक्रमणाविरुद्ध डावखरेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अतिक्रमणाविरुद्ध डावखरेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Next

ठाणे : शहरातील आराधना सिनेमा थिएटरजवळ एसटी बस आगारासाठी सुमारे ५ हजार चौरस मीटरचा भूखंड आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. पण, काही विकासकांनी हा भूखंड हडप करण्याच्या विचारातून बेकायदा बांधकाम उभे केले असल्याचा आरोप करून ते हटवण्यासाठी तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी केली आहे.
नागरिकांच्या दृष्टीने सोय म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात एसटीचे बस आगार महत्त्वाचे आहे. पण, त्यासाठी अद्यापही दिरंगाई होत आहे. याचा गैरफायदा घेऊन विकासकांची लॉबी मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा भूखंड आरक्षणमुक्त करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, या जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिल्याचेदेखील डावखरे यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
बेकायदा बांधकामे करून झालेल्या अतिक्रमणांविरोधात ठाणेकरांच्या भावना तीव्र आहेत. यासाठी आमदार संजय केळकर यांनी हा भूखंड तातडीने खरेदी करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने उपयुक्त असलेला एसटी बस आगार प्रकल्प बारगळण्यासाठी विकासक व प्रशासन यांची अभद्र युती सक्रिय आहे. लोकांच्या उपयोगासाठी असलेला हा बस प्रकल्प अंमलात आणण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी डावखरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)

ठाणे महानगरपालिकेच्या सन २००२च्या मंजूर विकास आराखड्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारासाठी सुमारे ५ हजार चौरस मीटर भूखंड आरक्षित आहे.

Web Title: Complaint against Chief Minister on the issue of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.