मुंबई : दिंडोशी पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्याने धडा शिकवण्यासाठी आपल्या मुलाविरूद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आपल्यावर हल्ला करून गंभीररित्या जखमी करणाऱ्या महिलेविरूद्ध दहा महिने कोणतीच कारवाई केली नाही, असे निवेदन मालाड येथील मोहन कृष्णन यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे.
तन्नकम कुरूप या त्यांचा मुलगा मोहन कृष्णन आणि सून मालविका यांच्या समवेत मालाड (पुर्व) येथील महेंद्र नगर येथे राहातात. ७ ऑगस्ट २0१८ रोजी दुपारी त्यांची सून मालविका कुरूप तळमजल्यावरील त्यांच्या फ्लॅटच्या बाल्कनीत मोबाईलचे नेटवर्क मिळण्याच्या प्रतिक्षेत होती. त्याचवेळी त्यांच्या शेजारी राहाणारी स्मिता पांचाळ ही इमारतीबाहेर उभी होती. मालविका मोबाईलवरून आपली छायाचित्रे काढत असल्याचा संशय स्मिता पांचाळला आला आणि तिने शिवीगाळ करीत आपल्या घरावर दगडफेक केली. त्यात बाल्कनीच्या काचा फुटल्या आणि मालविकासह आपण गंभीररित्या जखमी झाले, अशी तक्रार त्यांनी पोलीसांत दाखल केली.
या घटनेनंतर मोहन कृष्णन आणि स्मिता पांचाळ यांनी एकमेकांविरूद्ध तक्रारी दाखल केल्या आणि दिंडोशी पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हे दाखल केले. मोहन कृष्णन यांनी राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषद ही संस्था असून ते पोलिसांच्या गैरकारभाराबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करीत असतात. त्यामुळे पोलिसांनी हेतुपुरस्सर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करून आपल्यावर हल्ला करणाºया स्मिता पांचाळविरूद्ध गुन्हा दाखल करावा, असे निवेदन पोलिसांना दिले. पोलिसांनी तब्बल आठ महिन्यांनतर २९ एप्रिल रोजी तन्नकम कुरूप यांचा जबाब नोंदवला असला तरीही अद्याप करवाई करण्यात आलेली नाही.