अंधेरी ते विमानतळ प्रवासासाठी मागितले ३५० रुपये, रिक्षाचालकाविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 04:10 AM2020-01-21T04:10:26+5:302020-01-21T04:10:45+5:30

एका रिक्षाचालकाने अंधेरी ते विमानतळ या पाच किलोमीटरच्या प्रवासासाठी ३५० रुपये प्रवाशाकडे मागितले.

Complaint against rickshaw Driver | अंधेरी ते विमानतळ प्रवासासाठी मागितले ३५० रुपये, रिक्षाचालकाविरोधात तक्रार

अंधेरी ते विमानतळ प्रवासासाठी मागितले ३५० रुपये, रिक्षाचालकाविरोधात तक्रार

Next

मुंबई : एका रिक्षाचालकाने अंधेरी ते विमानतळ या पाच किलोमीटरच्या प्रवासासाठी ३५० रुपये प्रवाशाकडे मागितले. परंतु प्रवाशाने चालकाला पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर चालकाने ५० रुपये घेतले़, पण प्रवाशाला विमानतळाआधीच सोडले.
वसई येथील सुनील मल्होत्रा अंधेरी रेल्वे स्थानकावरून आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात होते. त्या वेळी रिक्षाचालकाने त्यांच्याकडे ३५० रुपये भाडे देण्याची मागणी केली. पण या साधारण ५ किमीच्या अंतरासाठी ५० रुपये मीटर होते. मल्होत्रा यांनी रिक्षाच्या नंबर प्लेटचा मोबाइलने फोटो काढला. त्यावर रिक्षाचालकाने त्यांना खाली उतरून देण्याची धमकी दिली. पण मल्होत्रा यांनी पोलीस कंट्रोल रूमला तुमचा रिक्षा नंबर देतो, असे सांगितले. तेव्हा त्याने ३५० ऐवजी १०० रुपये देण्याची मागणी केली. पण मल्होत्रा यांनी मीटरने ५० रुपये होतात, मी ५० रुपयेच देईन, असे सांगितले. तेव्हा पुढे रिक्षा जाऊ देत नाही, असे सांगत त्यांना विमानतळापूर्वीच उतरवले. मल्होत्रा यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली़

मीटरमध्येही गोंधळ ?
चालकाने रिक्षा सुरू करतानाही मीटर बंद ठेवला. मल्होत्रा यांनी हटकले तेव्हा वळण घेताना करतो, असे त्याने सांगितले. पण काही वेळानंतर जेव्हा चालकाने मीटर सुरू केला तेव्हा खाली २५ आणि वरती ३३१ दिसत होते. त्याला त्यांनी मीटरमध्ये बिघाड असल्याचे सांगितले असता नाइट चार्ज लागतो, असे सांगितले. रात्री प्रतिकिमी २३ रुपये आकारले जातात, विमानतळापर्यंत ३५० रुपये होतील, असे तो रिक्षाचालक म्हणाला.
 

Web Title: Complaint against rickshaw Driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.